• Download App
    Jayant Patil धर्मेंद्र प्रधानांच्या नेतृत्वाखाली मराठा इतिहासाशी छेडछाड; हा राजीनामा मराठ्यांचा इतिहास पुसणाऱ्यांना धडा, जयंत पाटलांची टीका

    Jayant Patil : धर्मेंद्र प्रधानांच्या नेतृत्वाखाली मराठा इतिहासाशी छेडछाड; हा राजीनामा मराठ्यांचा इतिहास पुसणाऱ्यांना धडा, जयंत पाटलांची टीका

    Jayant Patil

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Jayant Patil  नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी या राजीनाम्याचे स्वागत करत तो विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर, प्रधान यांच्या कार्यकाळात एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच प्रधानांचा राजीनामा मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी धडा असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.Jayant Patil

    जयंत पाटील म्हणाले की, “नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. पोलिसांचा लाठीचार्ज सहन करत जवळपास महिनाभर सुरू असलेल्या या लढ्यामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा मोठा विजय आहे.”Jayant Patil



    भाजपकडून ‘सिम्पथी’ निर्माण करण्याचा प्रयत्न

    धमेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्यांकडून सुरू असलेल्या सोशल मीडिया मोहिमेवर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. “प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केंद्र आणि राज्यातील अनेक भाजप नेते तसेच सत्ताधारी लोकप्रतिनिधी सोशल मीडियावर धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडत आहेत. प्रधान यांच्यावर अन्याय झाला किंवा त्यांनी चांगले काम करूनही राजीनामा द्यावा लागला, असा माहोल निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

    प्रधानांच्या काळात मराठा इतिहासाशी छेडछाड

    जयंत पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातील बदलांचा मुद्दा उपस्थित केला. “धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून इ.स. १७५९ मधील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळण्यात आला. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी जोडलेल्या मराठा इतिहासाशी छेडछाड करण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले,” असा आरोप त्यांनी केला.

    मराठ्यांचा इतिहास पुसू पाहणाऱ्यांना धडा

    “या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकडे केवळ एका मंत्र्याच्या पदत्यागाच्या दृष्टीने न पाहता, मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही हा धडा असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही,” असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

    Jayant Patil Reacts to Dharmendra Pradhan Resignation over Maratha History Controversy

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CJP, E20 जनता पार्टीच्या बरोबरीने RHA चा पण उदय, तब्बल 39 लाख फॉलोवर्स!!; RHA म्हणजे काय??, त्या आंदोलनाचा हेतू काय??; वाचा सविस्तर!!

    E20 janata party : मोदींना हरवू आणि हलवू शकत नाही म्हणून त्यांच्या विश्वासू मंत्र्यांवर हल्लाबोल!!

    PM Modi : मोदी म्हणाले– पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणणार; परीक्षा सुधारणांसाठी हायपॉवर टास्क फोर्स स्थापन, इन्फोसिसचे नीलेकणी होणार अध्यक्ष