• Download App
    E20 janata party : मोदींना हरवू आणि हलवू शकत नाही म्हणून त्यांच्या विश्वासू मंत्र्यांवर हल्लाबोल!!

    E20 janata party : मोदींना हरवू आणि हलवू शकत नाही म्हणून त्यांच्या विश्वासू मंत्र्यांवर हल्लाबोल!!

    नाशिक : शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर जेन झी च्या दंडात बेटकुळ्या फुटल्यानंतर जेन झी ने पुढचे टार्गेट ठेऊन वाटचाल चालू केली. त्यातूनच E20 janata party प्रसवली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टार्गेट करणे चालू केले.

    त्याआधी राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून त्यांनाच कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीमाराबद्दल दोषी धरले.

    – नितीन गडकरींच्या विरोधात षडयंत्र

    शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा एपिसोड होण्यापूर्वीच नितीन गडकरी यांनी त्यांच्या विरोधात होणाऱ्या षडयंत्राची पोलखोल केली होती. देशातली आणि देशाच्या बाहेरची २२ लाख कोटींची इंधन लॉबी इथेनॉल मिश्रणाचा विरोध करत आहे. कारण पेट्रोल मध्ये २० % इथेनॉल मिश्रण करणे त्यांना नको आहे. कारण इंधन लॉबीला त्यात त्यांचे आर्थिक नुकसान दिसते. पण प्रत्यक्षात पेट्रोल मध्ये २० % इथेनॉल मिश्रणामुळे भारताचे लाखो कोटी रुपयांचे परकीय चलन वाचेल. परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. पण इंधन लॉबीला यातून स्वतःच्या हितसंबंधांचे नुकसान दिसते म्हणून त्या लॉबीने षडयंत्र रचून आपल्याला अडचणीत आणल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी आधीच केला होता.



    E20 जनता पार्टीची स्थापना

    त्याचाच परिणाम धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिसला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यश मिळाल्याचे पाहून जेन झी ने फुरफुर चालू केली. त्यांनी E20 जनता पार्टी स्थापन करून नितीन गडकरी यांच्या विरोधात मोहीम चालू केली. E20 जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाउंट वर तुफान प्रतिसाद मिळाला. एका झटक्यात त्यांचे फॉलोवर्स लाखा लाखांनी वाढले. जे कॉक्रोच जनता पार्टीच्या बाबतीत घडले होते, नेमके तसेच E20 जनता पार्टीच्या बाबतीत घडले. या पार्टीचे इरादे सुद्धा सगळ्यांसमोर आले.

    – मोदींच्या विश्वासू सहकाऱ्यांवर हल्लाबोल

    पण हे सगळे राजकारण एका सूत्रात बांधलेले आणि एका दिशेने चाललेले दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट हरवता येत नाही आणि हलवता सुद्धा येत नाही, म्हणून मग त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांना धक्का लावा. त्यांना हलवा म्हणजे तरी मोदी सरकार हादरेल, हा या मागचा विरोधकांचा होरा दिसून आला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे विरोधकांच्या इराद्याला थोडा बूस्टर डोस मिळाला, पण म्हणून लगेच त्यातून दंडातल्या बेटकुळ्या काढून बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा ते हात घालू शकतील आणि आपला हेतू साध्य करून घेऊ शकतील, ही शक्यता फार कमी आहे‌. कारण विरोधकांचा “डाव” मोदी सरकारच्या निश्चित लक्षात आला आहे. त्यामुळे तो “डाव” उधळून लावण्यासाठी “प्रतिडाव” खेळणे अपरिहार्य आहे तोच “प्रतिडाव” वेगवेगळ्या मार्गांनी लवकरच समोर येण्याची दाट शक्यता आहे.

    E20 Janata Party: Unable to defeat or dislodge Modi, they are launching an all-out attack on his trusted ministers!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CJP, E20 जनता पार्टीच्या बरोबरीने RHA चा पण उदय, तब्बल 39 लाख फॉलोवर्स!!; RHA म्हणजे काय??, त्या आंदोलनाचा हेतू काय??; वाचा सविस्तर!!

    PM Modi : मोदी म्हणाले– पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणणार; परीक्षा सुधारणांसाठी हायपॉवर टास्क फोर्स स्थापन, इन्फोसिसचे नीलेकणी होणार अध्यक्ष

    Finance Minister : अर्थमंत्री म्हणाल्या- आयटी विभागाने सामान्य लोकांना त्रास देऊ नये; आपल्या ताकदीने घाबरवू नका; जनतेच्या भल्यासाठी काम करा