विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान आज पहिल्यांदाच संसदेत पोहोचले. संसद भवनात प्रवेश करताच भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी त्यांचे घोषणाबाजी करत उत्साहात स्वागत केले. विरोधकांना त्यामुळे मिरच्या झोंबल्या. या स्वागतामुळे संसदेत नव्या राजकीय वादाला तोंड फुटले असून, सत्ताधारी आणि विरोधकांनी या घटनेवरून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. Dharmendra Pradhan
– संसदेच्या परिसरात घोषणा
पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान प्रथमच संसदेत आले. संसदेच्या मकरद्वारावर भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी “धर्मेंद्र प्रधान झिंदाबाद” अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले. काही खासदारांनी त्यांना पारंपरिक पगडी परिधान करून सन्मान केला. त्यामुळे संसदेच्या परिसरात काही काळ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सत्ताधारी खासदारांनी प्रधान यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्याप्रती पाठिंबा कायम असल्याचा संदेश दिला. पण विरोधकांना मात्र धर्मेंद्र प्रधान यांचे स्वागत झोंबले.
– राजीनाम्यानंतरही पक्षाचा विश्वास कायम
पण राजीनामा दिल्यानंतरही धर्मेंद्र प्रधान यांचे पक्षातील महत्त्व कमी झालेले नसल्याचे या स्वागतावरून स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. भाजप आणि एनडीएतील अनेक नेत्यांनी त्यांना वैयक्तिक आणि राजकीय पाठिंबा दर्शविला. सत्ताधारी पक्षाने हा सन्मान त्यांच्या दीर्घ सार्वजनिक सेवेला दिलेली दाद असल्याचे सांगितले.
– विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्ला
दुसरीकडे, विरोधकांनी या स्वागतावर आक्षेप घेत सरकारवर टीका केली. काँग्रेससह विरोधी पक्षांनी पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई आणि आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांवर सरकारला लक्ष्य केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी केली. त्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई झाल्याचा आरोपही केला.
– पेपरफुटी वरून राजकीय संघर्ष
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पेपरफुटीचा मुद्दा संपलेला नाही. विरोधकांनी आता विद्यार्थ्यांवरील लाठीमार, गुन्हे दाखल करणे आणि पोलिसांच्या भूमिकेवर सरकारला घेरण्याची रणनीती आखली, तर सत्ताधारी पक्षाचा दावा आहे की सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन संवेदनशील भूमिका घेतली आणि जबाबदारी स्वीकारत योग्य निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्न अद्याप कायम आहेत. राजीनाम्यामुळे सरकारवरचा दबाव काही प्रमाणात कमी झाला असला, तरी विरोधकांनी या मुद्द्याला आगामी राजकारणात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला.
Former Education Minister Dharmendra Pradhan receives a rousing welcome in Parliament.
महत्वाच्या बातम्या
- Trump : ट्रम्प यांची इराणवर सर्वात मोठा हल्ला करण्यापासून माघार; सल्लागारांचा इशारा, देशात इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची कमतरता
- मोदींचा व्हिडिओतून तिसऱ्यांदा थेट विद्यार्थ्यांशी संवाद; नंदन निलकेणींच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स!!
- धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींची स्तुती; शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट अभिजीत दिपकेच्या घरी!!
- संघाचा एक मंत्री गेला, संघाचा दुसरा मंत्री आला; कम्युनिस्टांनी फोडला CJP चा फुगा!!