नाशिक : कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू केल्यानंतर 36 दिवसांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, पण एकट्या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, तरी राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सोबत सगळ्या विरोधकांना आपण मोदी सरकारलाच हटविल्याची आनंदाची उकळी फुटली.After Dharmendra Pradhan’s resignation Opposition leaders living in fools paradise
– दंड थोपटून आंदोलन थांबविले
वास्तविक धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायचा हा विषय आधीच झाला असला पाहिजे. त्याचे तपशील वेगवेगळ्या मार्गांनी नंतर बाहेरही येतील, पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याबरोबर कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पहिल्यांदा आनंदाची उकळी फुटली. झुकता है झुकानेवाला चाहिये, असे म्हणत अभिजीत दिपके याने दंड थोपटले. त्याच्यापाठोपाठ कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी सरकारचे प्रतिनिधी आपल्यासमोर झुकले, असे पत्रकार परिषदेत सांगून आंदोलन तात्पुरते थांबविल्याचे जाहीर केले.
– शरद पवारांनी उपटले श्रेय
त्यांच्या पाठोपाठ शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचे श्रेय स्वतःहून उपटून घेतले. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली त्याचा परिणाम आज दिसला आपणच त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा सल्ला दिला होता. त्यामुळे पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना आपण भेटलो, त्यावेळी तुम्ही सरकारशी चर्चा करायला नकार देऊ नका. तुम्ही सरकारशी चर्चा करा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला होता. आपण पंतप्रधानांना भेटून समन्वय घडवून दिला. त्याचवेळी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे, असे आपण त्यांना म्हणालो होतो, असा दावा शरद पवारांनी केला. त्याचबरोबर लोकशाहीने कात टाकल्याची डिंग सुद्धा त्यांनी वाजविली.
– राहुल गांधींचे पुढचे टार्गेट मोदी + संघ
राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन आपले पुढचे टार्गेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचे जाहीर केले. या दोघांनी ताब्यात घेतलेल्या संस्था सोडवून घेतल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, अशी दमबाजी सुद्धा त्यांनी केली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे तर छोटे प्रतिकात्मक पाऊल होते, पण देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर देशातल्या वेगवेगळ्या संस्थांच्या व्यवस्थांवर संघ आणि भाजप कब्जा करून बसलेत. त्यांना हटवून शिक्षण व्यवस्था आणि वेगवेगळ्या संस्थांच्या व्यवस्था मुक्त करणे, हेच काँग्रेस पक्षाचे मुख्य ध्येय असल्याचे राहुल गांधींनी जाहीर करून टाकले.
– ठाकरे बंधूंची दिपकेच्या मागे फरफट
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मातोश्रीवर एकत्रित पत्रकार परिषद घेऊन उद्याचा मोर्चा विजयी मोर्चा असल्याचे परस्पर जाहीर केले. वास्तविक कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन शिगेला पोहोचल्यानंतर त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिरकाव केला होता. त्या पार्टीच्या आंदोलनाशी शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता, तरीसुद्धा उद्धव ठाकरे त्या आंदोलनात जाऊन भाषण करून आले होते. पण तरीसुद्धा फक्त अभिजीत दिपकेला आंदोलनाचे श्रेय मिळू नये म्हणून ठाकरे बंधूंनी उद्याच्या मुंबईतल्या मोर्चाचा घाट घातला आणि आता तो मोर्चा यशस्वी मोर्चा म्हणून काढण्याचे जाहीर केले. पण त्याच वेळी त्यांनी अभिजीत दिपकेच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याने न मागताच पाठिंबा देऊन टाकला.
– पण मोदी सरकारची पुढची पावले जशीच्या तशी!!
या सगळ्या राजकारणात फक्त धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. मोदी सरकार जागचे हललेले नाही, पण विरोधकांना मात्र संपूर्ण मोदी सरकार हटविल्याची आनंदाची उकळी फुटल्याची दिसली. पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जसा प्रतीकात्मक राहिला, तशीच विरोधकांची आनंदाची उकळी प्रतिकात्मक राहण्याची दाट शक्यता आहे. कारण केंद्र सरकार पुढच्या आठवड्यात शिक्षण आणि परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत मांडून ते मंजूर करून घेणार आहे. त्याचबरोबर परकीय देण्ग्यासंदर्भातले विधेयक सुद्धा संसदेत मांडून मंजूर करून घेणार आहे. त्या पलीकडे जाऊन दोन तृतीयांश बहुमताची बेगमी झाली, तर डीलिमिटेशन बिल मंजूर करून विरोधकांवर पूर्ण मात करायचा सरकारचा इरादा आहे. तो इरादा मोदी सरकारने बिलकुल बदललेला नाही.
After Dharmendra Pradhan’s resignation Opposition leaders living in fools paradise
महत्वाच्या बातम्या
- सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीला फटकारताच कठोर कायदेशीर कारवाई; NTA ४७ अधिकारी बडतर्फ!!
- बांगलादेशाच्या अध्यक्षांचा अखेर राजीनामा; सांगितलेली आणि नेमकी खरी कारणे कोणती??
- धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या अलीकडच्या CJP च्या दोन मागण्या मान्य; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची CJP शी उद्या पुन्हा चर्चा
- सुप्रीम कोर्टाचे कार्ड एक्टिव्हेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि NTA कोणते दिले निर्देश??; वाचा सविस्तर!!