विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रंका यांनी आज केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेत पुन्हा एकदा आपल्या मागण्या मांडल्या. जवळपास तासभर ही बैठक सुरु होती. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना CJP च्या प्रवक्त्यांनी आमच्या दोन मागण्या मान्य झाल्याची माहिती दिली, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारी २.०० वाजेपर्यंतची वेळ मागितली असल्याचे सांगितले. याचा अर्थ मोदी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायच्या अलीकडच्या दोन मागण्या मान्य केल्याचे स्पष्ट झाले. Cockroach Janta Party
– कोणत्या दोन मागण्या मान्य??
CJP ने दिलेल्या माहितीनुसार, पीडितांना 1 कोटींची नुकसान भरपाई देणे आणि विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य झाली.
अनेक विद्यार्थ्यांना काल रात्रीपासून ताब्यात ठेवलेय. जंतर मंतरवरून घरी जाणारे, घरुन येथे येणारे सर्वांना ताब्यात घेतले जात आहे. पण असे होत असेल, तर तसे होऊ देणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले.
संपूर्ण देशभरात आंदोलन सुरु असून, ते वाढत जातील. धर्मेद्र प्रधान यांना बरखास्त केले नाही किंवा राजीनामा घेतला नाही तर कॉकरोच जनता पार्टीला मोठा निर्णय घ्यावा लागेल, असे सीजीपेचे आशुतोष राणा यांनी सांगितले.
– उद्या दुपारी पुन्हा चर्चा
जे. पी. नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, जवळपास 2 तास चर्चा झाली. माझ्यासोबत जितेंद्र सिंग चर्चेत सहभागी होते. आम्ही विद्यार्थी प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावर सर्व बाजूंनी चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या आणि 5 बदल सुचविले. आम्ही त्यांना उद्या दुपारी पुन्हा भेटू आणि सरकार मध्ये जी चर्चा होईल, त्याबद्दल माहिती देऊ, असे त्यांना सांगितले आहे.
Union Ministers JP Nadda, Jitendra Singh meet Cockroach Janta Party reps over exam row
महत्वाच्या बातम्या
- Monique Barbut : फ्रान्समध्ये कृषी कायद्याला विरोध, पर्यावरण मंत्र्यांचा राजीनामा;
- CJP : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात मध्यस्थीच्या चर्चेसाठी मोदी सरकारने जे. पी नड्डांनाच का निवडले??; वाचा सविस्तर कारणे!!
- यालाच तर जंतर – मंतर म्हणतात; राज ठाकरेंचे मोदी – पवार भेटीवर अचूक बोट!!
- CJP : कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींना सरकारचे चार वेळा चर्चेचे निमंत्रण; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे निवेदन