• Download App
    Modi government choose J.P. Nadda to lead mediation talks during the 'Cockroach Janata Party's' agitation? Read the detailed reasons! CJP : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात मध्यस्थीच्या चर्चेसाठी मोदी सरकारने जे. पी‌ नड्डांनाच का निवडले??; वाचा सविस्तर कारणे!!

    CJP : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात मध्यस्थीच्या चर्चेसाठी मोदी सरकारने जे. पी‌ नड्डांनाच का निवडले??; वाचा सविस्तर कारणे!!

    J.P. Nadda

    नाशिक : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन चिघळले. ते राहुल गांधींनी काँग्रेसच्या ताब्यात घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तच चिथावणी मिळाली. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी आणि देशभरात सरकारच्या बाजूने सकारात्मक संदेश वाचविण्यासाठी जी पावले उचलली, त्यामध्ये एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याच्या मध्यस्थीसाठी निवडले. जगत प्रकाश नड्डा यांनी आंदोलनाच्या लाठीमारात जखमी झालेल्या रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी सोनं वांगचुक याची सुद्धा मेदांता रुग्णालयात जाऊन भेट घेतली.Modi government choose J.P. Nadda to lead mediation talks during the ‘Cockroach Janata Party’s’ agitation? Read the detailed reasons!

    राहुल गांधींनी गनिमी कावा करून राजाजी मार्गावरून लोककल्याण मार्गावर मोर्चा वळवताच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे सुद्धा त्यांना जाऊन भेटले. पण राहुल गांधींनी जितेंद्र सिंह यांना या सगळ्या राजकारणात संदर्भाहीन करून टाकले. मात्र जगत प्रकाश नड्डा यांच्या बाबतीत ते काही बोलू शकले नाहीत. याचे कारण जगत प्रकाश नड्डा यांच्या राजकीय व्यक्तिमत्व दडलेले दिसून आले.



    – नड्डांची सुरुवात विद्यार्थी आंदोलनातून

    जगत प्रकाश नड्डा यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवातच मुळे विद्यार्थी आंदोलनापासून झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा त्यांना भरपूर अनुभव आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी सारख्या राष्ट्रव्यापी पार्टीचे नेतृत्व केल्यानंतर ते काही काळ प्रसिद्धीच्या झोतापासून दूर गेले होते. ते केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून आधी काम करत होते आणि आताही काम करत राहिले. जगत प्रकाश नड्डा यांच्या पक्षातल्या ज्येष्ठत्वामुळे त्यांचे स्थान पक्षात आणि पक्षा बाहेर सुद्धा विशिष्ट दर्जाचे बनले. या विशिष्ट दर्जाचाच सुयोग्य लाभ घेण्यासाठी मोदी सरकारने त्यांची विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी निवड केली. जगत प्रकाश नड्डा एकीकडे तत्त्वनिष्ठ म्हणून ओळखले जातातच, पण त्याचबरोबर उत्तम संवाद शैलीमुळे ते विरोधकांशी सुद्धा चांगला संवाद साधू शकतात. हे त्यांचे कौशल्य विद्यार्थ्यांशी चर्चा करताना उपयोगी ठरू शकेल, असे मोदी सरकारला वाटले. त्यामुळे त्यांनी नड्डा यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांची निवड केली.

    – इतर ज्येष्ठ नेत्यांना का नाही निवडले??

    पण एरवी कुठल्याही राजकीय पेचप्रसंगात राजनाथ सिंह यांना सरकारने पुढे केले असते. त्यांना विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची विनंती केली असती, पण मोदी सरकारने राजनाथ सिंह यांना पुढे केले नाही, कारण त्यांच्यासारख्या सर्वांत ज्येष्ठ मंत्र्यांना विद्यार्थ्यांशी चर्चेसाठी पुढे केले असते, तर मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अपेक्षेपेक्षा जास्तच महत्त्व देत आहे, असे चित्र देशभर निर्माण झाले असते. तसे चित्र मोदी सरकारला देशभर निर्माण होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे मोदी सरकारने राजनाथ सिंह यांना चर्चेसाठी पुढे केले नाही. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुद्धा विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करायला पुढे आणले नाही. याचे कारणही विद्यार्थी आंदोलनाला विशिष्ट मर्यादेपलीकडे महत्त्व देणे मोदी सरकारला मान्य नव्हते. पण त्याचवेळी जगत प्रकाश नड्डा यांच्यासारख्या जेष्ठ मंत्र्यांना विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी पुढे करून विद्यार्थी आंदोलनाला सरकार योग्य ते महत्त्व देत आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी सरकार गंभीर आहे, हा संदेश मोदी सरकारला द्यायचा होता, तो जगत प्रकाश नड्डा यांच्या निवडीतून साध्य झाला.

    Modi government choose J.P. Nadda to lead mediation talks during the ‘Cockroach Janata Party’s’ agitation? Read the detailed reasons!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pannu Claims : कॉकरोचच्या आंदोलनात दहशतवादी पन्नूची एंट्री; CJP नेत्यांसोबत झूम मीटिंगचा दावा; म्हटले- दिल्ली-मोदींना पाडायचे आहे

    Anurag Jain : नीती आयोगाचे सीईओ बनले अनुराग जैन; 31 ऑगस्ट रोजी संपत आहे एमपीच्या मुख्य सचिवांचा कार्यकाळ, नवीन प्रशासकीय प्रमुखाचा शोध सुरू

    यालाच तर जंतर – मंतर म्हणतात; राज ठाकरेंचे मोदी – पवार भेटीवर अचूक बोट!!