विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिल्लीतल्या जंतर – मंतर वर कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. कारण विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा नेला होता त्यावेळी लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर काँग्रेसनेही आंदोलन केलं. या सगळ्या घटना घडत असताना शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. शरद पवारांच्या भेटीबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली.jantar-Mantar’; Raj Thackeray hits the nail on the head regarding the Modi-Pawar meeting!!
शरद पवारांनी भेटीबाबत काय सांगितलं?
शरद पवार यांच्या एक्स हँडलवर त्यांनी या भेटीमागचा उद्देश आणि प्रत्यक्ष भेटीत कोणती चर्चा झाली, याची माहिती दिली. त्यांनी लिहिले, नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली अयोग्य वागणूक, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे यासंदर्भात पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. देशातील आणि महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील प्रशासकीय आणि धोरणात्मक त्रुटी, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या व विविध प्रलंबित मागण्या या गंभीर विषयांवर चर्चा केली, असेही शरद पवार यांनी लिहिले. शरद पवारांनी मोदींच्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले राज ठाकरे यांनी भेटीवर सूचक भाष्य केले.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
दिल्लीत आंदोलन सुरु असताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत बुधवारी भेट घेतली. त्याबाबत प्रश्न विचारला असता, यालाच तर जंतर – मंतर असे म्हणतात असे उत्तर दिले. शरद पवार यांच्याबाबत राज ठाकरेंनी सूचक भाष्य करताच पत्रकारांना हशा पिकला. जंतर – मंतर हे दिल्लील्या मैदानाचं नाव असले, तरी जंतर – मंतर या शब्दाचा अर्थ जादूटोणा किंवा किमया असाच होतो. राज ठाकरेंनी शरद पवार हे राजकारणात असेच जंतर – मंतर म्हणजे जादूटोणा करतात, असे सूचित करणारी प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘Jantar-Mantar’; Raj Thackeray hits the nail on the head regarding the Modi-Pawar meeting!
महत्वाच्या बातम्या
- Punjab Farmers : पंजाबच्या शेतकऱ्यांचे दिल्लीकडे कूच स्थगित; 2 मागण्यांवर सहमती; शंभू-खनौरी बॉर्डर सील
- Remittances : युद्धाचा रेमिटन्सवर परिणाम नाही; विदेशातून भारतीयांनी पाठवले 14 लाख कोटी रु., 12 वर्षांत दुप्पट
- UP Govt : यूपीत पदवीधर विद्यार्थिनींना स्कूटी मिळेल; 330 किमी लांबीचा विंध्य एक्सप्रेस-वे तयार होईल; मंत्रिमंडळाकडून 18 प्रस्ताव मंजूर
- याला म्हणतात, Assignment based काम; CJP आंदोलनाच्या गदारोळात शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!