• Download App
    Jitendra Singh. CJP : कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींना सरकारचे चार वेळा चर्चेचे निमंत्रण; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे निवेदन

    CJP : कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींना सरकारचे चार वेळा चर्चेचे निमंत्रण; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे निवेदन

    CJP

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांच्या प्रतिनिधींनी दोन वेळा सरकारशी चर्चा केली. पण दोन्ही चर्चांमधून तोडगा निघू शकला नाही. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींना आत्तापर्यंत किमान चार वेळा चर्चेचे निमंत्रण दिले. पण या पार्टीने सरकारचे निमंत्रण अद्याप तरी स्वीकारलेले दिसले नाही, उलट त्यांनी ते निमंत्रण धुडकावले. त्या पार्टीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्र्यांनीच जंतर – मंतरवर येऊन चर्चा करायची मागणी केली.Cockroach Janata Party

    कॉकरोच जनता पार्टीसोबत चर्चेच्या अद्ययावत प्रस्तावावर केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “काल दुपारपासून सरकारने त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चेसाठी चार वेळा अधिकृत प्रस्ताव पाठवले आहेत. आमच्या सर्व युवा मित्रांना हे एक खुले निमंत्रण आहे की, सरकार तुमच्या सोयीनुसार, कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. आम्ही प्रतिष्ठेचा किंवा अहंकाराचा प्रश्न निर्माण करत नाही. चर्चेसाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि मी स्वतः उपस्थित राहू. चर्चेच्या माध्यमातून आपण हळूहळू तोडग्याकडे वाटचाल करू. ही चर्चा जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयात किंवा निवासस्थानी होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकारने उचललेल्या सातत्यपूर्ण पावलांचाच हा एक भाग आहे. मी तुम्हा सर्वांना नम्र आवाहन करतो की, तुम्ही यावे आणि चर्चा करावी.”



    CJP- निर्मला सीतारामन यांचे निवेदन

    ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (विरोधकांच्या) निदर्शनांवर बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “पेपर फुटी मधल्या गुन्हेगारांना वेळेवर अटक करणे, फेरपरीक्षा वेळेवर घेणे आणि निकाल वेळेवर जाहीर करणे यांसारख्या गोष्टींची सरकारकडून खात्री दिली जात आहे. सध्या तरुण उच्च शिक्षणासाठी योग्य संस्थांची निवड करत आहेत. या सर्व घडामोडी सुरू असतानाच, असेही काही तरुण पुढे येत आहेत जे म्हणतात की, ‘सुरुवातीला पेपरफुटीमुळे मला नक्कीच त्रास झाला किंवा वाईट वाटले, पण नंतर मी त्या परिस्थितीचा सकारात्मक फायदा करून घेतला; मी अधिक चांगली तयारी केली, माझी कामगिरी सुधारली आणि मी उत्तम यश मिळवले.’ म्हणजेच, असेही तरुण आहेत ज्यांनी या आव्हानाचा स्वीकार केला, त्याचा सामना केला आणि त्यात घवघवीत यश मिळवले. थोडक्यात सांगायचे तर, सरकार यावर योग्य ती पावले उचलत आहे आणि पंतप्रधानही याकडे लक्ष देऊन प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे उगाच आंदोलन पुढे चालू ठेवण्यात मतलब नाही.”

    CJP: Government invites ‘Cockroach Janata Party’ representatives for talks four times; statement by Union Minister Jitendra Singh.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    यालाच तर जंतर – मंतर म्हणतात; राज ठाकरेंचे मोदी – पवार भेटीवर अचूक बोट!!

    Kunal Ghosh : ममता समर्थक आमदाराला मार्शलने विधानसभेतून बाहेर काढले; टीएमसी बंडखोर गटाच्या आमदाराला बोलण्यापासून रोखले होते

    Lalit Modi : ललित मोदी 16 वर्षांनंतर भारतात परतणार; ED चा दंड रद्द; IPL चे पैसे परदेशात पाठवण्याचे प्रकरण