नाशिक : याला म्हणतात, Assignment based काम, असंच म्हणायची वेळ शरद पवारांनी आज घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर आली. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन भडकत असताना आणि राहुल गांधींनी त्यामध्ये नौटंकी करत का होईना, पण उडी घेतली असताना, आज अचानक शरद पवारांना कुठलेतरी “महत्त्वाचे” काम आठवले आणि ते एक फाईल हातात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी त्यांच्या संसद भवनातल्या कार्यालयात पोहोचले.
– खळखळून हसून स्वागत
नरेंद्र मोदींनी हातात हात घेऊन पवारांचे स्वागत केले. त्यांच्याबरोबर ते खळखळून हसले. मराठी माध्यमांनी त्या खळखळून हसण्याच्या बातम्या केल्या. त्यामुळे पवार “धन्य धन्य” झाले. यावेळी त्यांच्यासमवेत सुप्रिया सुळे होत्या. पवारांनी नेमके कुठले काम घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली??, हे मात्र गुलदस्त्यात ठेवले. पवारांनी नरेंद्र मोदींना नेमके कुठले पत्र दिले??, याविषयी सुद्धा अजून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी तरी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून कुठली माहिती दिली नाही. त्यामुळे पवारांनी फक्त मोदींची भेट घेतली, एवढ्याच बातम्या मराठी माध्यमांना करता आल्या. नेमक्या कुठल्या विषयावर भेट झाल्याचे समजले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या भेटीवरून पतंग उडवले. सध्या विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात मध्यस्थी करण्यासाठी शरद पवार कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले असतील, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला.
– राहुल गांधींच्या एन्ट्रीला फाऊल
पण शरद पवारांची भेट कुठल्याही कारणासाठी असली आणि शशिकांत शिंदे यांनी कुठलाही दावा केला असला, तरी शरद पवारांच्या आजपर्यंतच्या राजकीय सवयीनुसार त्यांनी विरोधकांच्या आंदोलनात खोडा घालण्यासाठी किंवा राहुल गांधींच्या आंदोलनातल्या एन्ट्रीलाच फाऊल करण्यासाठी मोदींची भेट घेतली असावी याविषयी संशय घ्यायला निश्चितच वाव आहे.
– मोदींची शरद पवारांना Assignment
किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना विरोधकांना कायम वेगवेगळ्या मार्गांनी foul करण्यासाठी assignment च देऊन ठेवली आहे. विरोधकांचे कुठलेही आंदोलन शिगेला पोहोचायच्या आत शरद पवारांनी foul करायचा, हीच Assignment आहे. म्हणूनच काल राहुल गांधी ज्यावेळी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर 7 लोक कल्याण मार्गावर पोहोचले, त्यानंतर तिथे अखिलेश यादव सुद्धा गेले. पण शरद पवार हे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्याबरोबर लोककल्याण मार्गावर गेले नव्हते. ते त्याचवेळी अभिजीत दिपकेला भेटण्यासाठी जंतर – मंतर वर गेले. त्यांच्यासमवेत त्यावेळी सुद्धा सुप्रिया सुळे होत्या. एकीकडे राहुल गांधींचे आंदोलन दुसरीकडे शरद पवारांची अभिजीत दिपकेशी भेट एकाच वेळी घडल्यामुळे माध्यमांच्या प्रसिद्धीचा फोकस विभागला गेला. शरद पवारांची अभिजीत दिपकेशी झालेली भेट ही सुद्धा Assignment based च वाटली. कारण शरद पवारांनी political timing साधून राहुल गांधींच्या आंदोलनाला foul केला होता.
– permanent assignment
राहुल गांधींनी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मोदी सरकार विरुद्ध कठोर भूमिका घेतल्या, त्यांनी अदानी आणि अंबानींच्या विरोधात आगपाखड केली, त्या प्रत्येक वेळी शरद पवारांनी अदानी आणि अंबानी यांची बाजू उचलून धरली, पर्यायाने त्यांनी नरेंद्र मोदींची बाजू उचलून धरली. शरद पवारांसाठी ते काम तर permanent assignment based ठरले. शरद पवारांनी आपली नरेंद्र मोदींशी असलेली जवळील अनेकदा दाखविली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, साखर कारखानदारांच्या समस्या आणि पुणे – पिंपरी चिंचवड परिसरातल्या बिल्डर लोकांच्या समस्यांसाठी त्यांनी अनेकदा नरेंद्र मोदींना पत्रं लिहिली. शरद पवारांनी नेहमीच असे assignment based काम केले. आजही शरद पवारांनी नरेंद्र मोदींची घेतलेली भेट या assignment based कामापेक्षा वेगळी नव्हती. फक्त मराठी माध्यमांनी हे सत्य सांगितले नाही. मी शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांची भेट फक्त glorify केली.
Sharad Pawar and party MP Supriya Sule met Prime Minister Narendra Modi at the Parliament, in Delhi.
महत्वाच्या बातम्या
- Ukraine : युक्रेनमध्ये जहाजावर हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारताने म्हटले- व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे निंदनीय
- Andy Burnham Sworn : अँडी बर्नहॅम ब्रिटनचे नवे पंतप्रधान; 10 वर्षांत सातवे पंतप्रधान बनले; पाकिस्तानी वंशाच्या शबाना महमूद अर्थमंत्री होऊ शकतात
- Food Delivery : चीनमध्ये फूड डिलिव्हरी बॉयला सर्वात मोठा साहित्यिक सन्मान; जेवण पोहोचवताना अनेक कविता लिहिल्या
- Ram Mandir : राममंदिर देणगी चोरी- SC म्हणाले- यूपी सरकारने पुन्हा SIT करावी; IPL अधिकाऱ्याला जबाबदारी सोपवा, प्रकरणाचे राजकारण होऊ नये