विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : Pandharpur आषाढी एकादशीचा सोहळा 25 जुलै रोजी साजरा होत असून पंढरपुरात दोन लाखांहून अधिक वारकऱ्यांची मांदियाळी जमली आहे. विठ्ठल दर्शन रांगेत सध्या २० हजारांहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी 12 ते 14 तासांचा अवधी लागत आहे. दर्शनरांग गोपाळपूरजवळील सोळा नंबर शेडपर्यंत गेली असून दर्शन वेग प्रति मिनिट 32 ते 35 आहे. व्हीआयपी दर्शन बंद असले तरी रांगेत घुसखोरी आणि पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयीच्या अनेक तक्रारी आहेत. भोवळ आलेल्या एका भाविकाला वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने रिक्षातून रुग्णालयात न्यावे लागले. संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांसह इतर संतांच्या पालख्या बुधवारी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करतील. दरम्यान, मंदिर परिसरातील ६५ एकर मैदानात ६५० दिंड्यांचे बुकिंग झाले आहे.Pandharpur
‘विठ्ठल सोयरा सज्जन विसावा। जाईन त्याच्या गावा भेटावया ।। सीण भाग त्यासी सांगेन आपुला। तो माझा बापुला सर्व जाणे।।’ या संत तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे श्री क्षेत्र देहूहून आषाढी वारीसाठी निघालेली दिंडी सोमवारी अकलूजमध्ये पुढे मार्गस्थ झाली. माळीनगरमध्ये सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पार पडले. रिंगणामध्ये मानाचा अश्व सुुरुवातीला धावला. त्यानंतर स्वाराच्या अश्वाने दौड केली. अश्वाचे दर्शन घेण्यासाठी रिंगणाच्या दोन्ही बाजूला भाविकांनी गर्दी केली होती. भाविक अश्वाला स्पर्श करण्याची धडपड करत होते. छाया : शुकूर तांबोळी, अकलूजPandharpur
दम लागल्याने चंद्रभागेत बुडू लागणाऱ्या नांदेडच्या तीन वारकऱ्यांना जीवदान
उजनी आणि वीर धरणामधून पाणी सोडल्याने चंद्रभागा नदी भरून वाहत आहे. मंगळवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातील सूरज, गणेश आणि सतीश भोकरे हे वारकरी नदीपात्रात पोहताना दम लागल्याने बुडू लागले. गस्तीवर असलेल्या बचाव पथकाच्या जवानांनी तात्काळ उडी घेऊन त्यांना सुखरूप बाहेर काढले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुरक्षेसाठी चंद्रभागा नदीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यापक आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. गस्त व बचावकामासाठी १८० आपदा मित्रांचे पथक आणि १७ रेस्क्यू बोटी तैनात आहेत.
Over 2 Lakh Devotees Arrive in Pandharpur for Ashadhi Ekadashi 2026
महत्वाच्या बातम्या
- Ukraine : युक्रेनमध्ये जहाजावर हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारताने म्हटले- व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे निंदनीय
- Andy Burnham Sworn : अँडी बर्नहॅम ब्रिटनचे नवे पंतप्रधान; 10 वर्षांत सातवे पंतप्रधान बनले; पाकिस्तानी वंशाच्या शबाना महमूद अर्थमंत्री होऊ शकतात
- Food Delivery : चीनमध्ये फूड डिलिव्हरी बॉयला सर्वात मोठा साहित्यिक सन्मान; जेवण पोहोचवताना अनेक कविता लिहिल्या
- Ram Mandir : राममंदिर देणगी चोरी- SC म्हणाले- यूपी सरकारने पुन्हा SIT करावी; IPL अधिकाऱ्याला जबाबदारी सोपवा, प्रकरणाचे राजकारण होऊ नये