Pandharpur : पंढरपुरात 15 दिवस मटण-मांस विक्रीवर कडक बंदी; आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीत दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर करत, पंढरपूर शहर आणि नजीकच्या परिसरात १५ जुलै ते २९ जुलै असे सलग १५ दिवस मांस आणि मटण विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.