नाशिक : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मटण – मांस विक्रीवर बंदी; पण खवचट मराठी माध्यमांना “खटकली” खवय्यांची “कोंडी”!! असला प्रकार आज समोर आला.
आषाढी वारी आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या फडणवीस सरकारने पंढरपुरात मटण आणि मांस विक्रीवर 15 जुलै ते 29 जुलै अशी बंदी घातली. ही बंदी काटेकोरपणे पाळण्याचे आदेश सुद्धा प्रशासनाला दिले. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पंढरपुरातल्या मटण मांस विक्री संदर्भात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
– बातम्यांना जोडले शेपूट
काही मराठी माध्यमांनी त्याच्या बातम्या वेगवेगळ्या पद्धतीने रंगवून दिल्या. पंढरपुरात आषाढी वारीच्या आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मटण विक्रीवर बंदी लादल्याने वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला, अशा बातम्या अनेक मराठी माध्यमांनी दिल्या. पण त्याचवेळी काही खवचट माध्यमांनी त्या बातम्यांना खवय्यांची कोंडी झाल्याचे शेपूट जोडले.
– मटण – मांस विक्रीवर नियमित बंदी
वास्तविक आषाढी वारी आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर सारख्या धर्मभूमीत लाखोंनी वारकरी येतात. ते विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जातात. या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रशासन नेहमीच मटण आणि मांस विक्रीवर बंदी घालते. यात विशेष काही घडत नाही, पण अनेकांना अनेक ठिकाणी मटण आणि मांस विक्रीची त्याच वेळी खुमखुमी येते. खाद्य स्वातंत्र्याच्या नावाखाली ते सनातन संस्कृतीचा अपमान करायचा “डाव” खेळतात. मग वारीमध्ये कुठल्या कसायाच्या नावाने दिंडी काढतात, नाहीतर छाप्या पद्धतीने ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतात. विठ्ठलाच्या ऐवजी ख्रिस्ताची पूजा करायला सांगतात.
– मराठी माध्यमांचा खवचटपणा
काही मराठी माध्यमांनी असल्यास प्रकाराला छुप्या पद्धतीने चिथावणी देत आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात मटण माणूस विक्रीवर बंदी केली पण त्यामुळे खवय्यांची कोंडी झाली, अशा बातम्या दिल्या. आषाढी वारीच्या पंधरा दिवसात जणू काही खवय्यांनी मटन मांस खाल्लेच नाही, तर त्यांना काही रोग जडेल किंवा विकार होईल असा आव काही खवचट मराठी माध्यमांनी आणला.
Ban on mutton and meat sales in Pandharpur against the backdrop of the Ashadhi Wari.
महत्वाच्या बातम्या
- Nepal Gen Z : नेपाळमध्ये पुन्हा जेन-झी आंदोलन; 3 दिवसांत 3 आत्मदहन; बेरोजगारीविरुद्ध संताप; पंतप्रधान बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
- Khalistani : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यापूर्वी लिहिले खलिस्तानी नारे; दहशतवाद्याने ट्रेनमधील व्हिडिओ जारी केला; खालडांचा उल्लेख
- राजकारणाच्या धकाधकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रमले मूल गावी!!
- अयोध्येच्या राम मंदिरातल्या चोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची एन्ट्री; SIT ला तपासाचा अहवाल देण्याचे आदेश!!