विशेष प्रतिनिधी
नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातल्या दरे गावी गेले की त्यांच्या नाराजीच्या बातम्यांना पेव फुटते, पण पण शिंदे यांच्या खेरीज दुसरेही राजकारणी कधीतरी मूळ गावी जाऊ जुन्या आठवणींमध्ये रमतात, असे चित्र नुकतेच दिसले. राजकारणाच्या धकाधकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूल गावी रमले!! Devendra Fadnavis
विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि शासकीय बैठका यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दौरा केला. त्या वेळी त्यांनी मूल गावाला भेट दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल हे देवेंद्र फडणवीस यांचे मूळ गाव. तिथे त्यांचा वडिलोपार्जित वाडा आणि शेती आहे. सध्याच्या राजकारणाच्या धकाधकीत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नागपूर दौऱ्यात मूल गावाला भेट देऊन ते तिथे जुन्या आठवणीत रमले. त्यांनी तिथला नवा अनुभव सोशल मीडिया अकाऊंट वर शेअर केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या माझ्या वडिलोपार्जित गावी जाण्याचा नुकताच योग आला. दुर्गामातेचे दर्शन घेणे, शतचंडी यज्ञात सहभागी होणे, तिच्या चरणी प्रार्थना करून आशीर्वाद घेणे, हा अत्यंत आत्मिक समाधान देणारा अनुभव होता!!
- माझ्या गावाला दिलेली प्रत्येक भेट मनाला अत्यंत भावूक करून जाते. कारण बालपणी तिथे घालवलेल्या अनेक दिवसांच्या अनंत आठवणी पुन्हा जाग्या होतात!!
- आमचे सगळे कुटुंबीय, भावंडे, माजी मंत्री शोभाकाकू फडणवीस आणि स्थानिकांबरोबर घालवलेले क्षण माझ्यासाठी खरोखर अविस्मरणीय आहेत. या ठिकाणी येण्याचा प्रत्येक योग या भूमीशी असलेले माझे ऋणानुबंध अधिक दृढ करतो!!
Chief Minister Devendra Fadnavis spends a relaxed time in his native village, Mul.
महत्वाच्या बातम्या
- उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- Nita Ambani : नीता अंबानी देशातील सर्वात शक्तिशाली महिला; फॉर्च्यून इंडियाच्या यादीत नंबर 1 वर; टॉप-10 मध्ये ईशा अंबानीचाही समावेश
- Iran Assassination : इराणची खामेनींच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी, ट्रम्प म्हणाले- इराणवर 1000 क्षेपणास्त्रे रोखलेली
- Mobile Recharge : डेटा नसलेले मोबाइल रिचार्ज प्लॅन स्वस्त होतील; ट्रायने मसुदा सादर केला, सूचना मागवल्या; किंमत 70% पर्यंत कमी होऊ शकते