• Download App
    Ram Janmabhoomi Teerth Kshetra राम मंदिरात चोरीचा दणका बसल्यानंतर श्री राम जन्मभूमी ट्रस्ट मध्ये सुधारणा; CEO पदासाठी मागविले अर्ज!!; वाचा अटी शर्ती!!

    राम मंदिरात चोरीचा दणका बसल्यानंतर श्री राम जन्मभूमी ट्रस्ट मध्ये सुधारणा; CEO पदासाठी मागविले अर्ज!!; वाचा अटी शर्ती!!

    नाशिक : अयोध्येमधल्या राम मंदिरात देणगीच्या चोरीचा दणका बसल्यानंतर श्री राम जन्मभूमी ट्रस्ट मध्ये सुधारणा झाली. त्यांनी ट्रस्टचा आणि मंदिराचा कारभार सुधारण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नेमायचा निर्णय घेतला. त्यासाठी ट्रस्टने अधिकृतरित्या मुख्य कार्यकारी पदासाठी विशिष्ट अटी शर्ती लागू करून अर्ज मागविले आहेत.

    श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र (न्यास) द्वारे श्री राम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख: शनिवार, १८ जुलै २०२६; दुपारी ४.०० वाजता!!, असे निवेदन श्री राम जन्मभूमी ट्रस्टने जारी केले.

    – चंपत राय यांचा कारभार

    अयोध्येमध्ये श्री राम जन्मभूमीच्या स्थानी भव्य मंदिर निर्माणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर श्री राम जन्मभूमी ट्रस्टची स्थापना झाली. त्याचवेळी मंदिराच्या निर्मितीच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी नेमणे अपेक्षित होते. परंतु, ट्रस्टने त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेमला नव्हता. मंदिराचा सगळा कारभार ट्रस्ट सरचिटणीस चंपत राय यांच्यामार्फतच पाहिला जात होता. त्यांनीच आपल्या विश्वासातले पदाधिकारी ट्रस्टवर आणि प्रत्यक्ष मंदिराच्या कामकाजासाठी नेमले होते. स्वतः चंपत राय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दीर्घकाळ प्रचारक होते. श्री राम मंदिर संपूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाखाली होते. राम मंदिराचा कारभार चंपत राय यांच्या नियंत्रणाखाली सुरू राहिला होता. त्यावेळी श्री राम मंदिर निर्माण समितीचे प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी श्री राम मंदिरासाठी अधिकृत व्यवस्था म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी नेमायचा सल्ला दिला होता. परंतु चंपत राय आणि श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी तो सल्ला मानला नव्हता. त्यांनी ट्रस्टच्या कारभारावर संपूर्णपणे स्वतःचे नियंत्रण ठेवले होते.

    – चंपत राय यांच्या निकटवर्तीयाकडून चोरी

    मात्र, याच दरम्यानच्या काळात चंपत राय आणि ट्रस्टने नेमलेल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी श्री राम मंदिरातल्या देणगी वर हात मारला. तिथे रामाच्या चरणी अर्पण केलेल्या लाखो रुपयांच्या रकमांचा अपहार केला. त्यामुळे ट्रस्ट मधल्या कारभारातील सर्व उणीवा उघड्यावर आल्या. चंपत राय यांच्या निकटवर्तीयांनी ट्रस्टचा विश्वासघात केल्याचे उघडकीस आले. त्याचवेळी चंपत राय आणि ट्रस्ट यांनी अधिकृतपणे कुठल्याच कर्मचाऱ्याला कामासाठी नेमले नसल्याचाही धक्कादायक खुलासा झाला होता. त्यामध्ये अगदी बँकेशी झालेला करार आणि त्यातल्या उणीवा सुद्धा उघडकीस आल्या होत्या. ट्रस्टला मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्यामुळे अधिकार्‍यांची आणि कर्मचाऱ्यांची अधिकृत जबाबदारीच निश्चित झालेली नव्हती. सर्व कारभार अनौपचारिक आणि केवळ विश्वासावर चालला होता, पण त्याच्यामध्ये आवश्यक असलेले व्यवस्थापन आणि व्यावसायिकता नव्हती. त्यामुळे राम मंदिरात झालेली चोरी उघडकीस यायला सुद्धा वेळ लागला होता.

    – अटी आणि शर्ती

    पण राम मंदिरातल्या चोरीनंतर चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाळ राव यांना राजीनामे द्यायला लागले. त्यानंतर ट्रस्ट मधल्या सदस्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी श्री राम मंदिर ट्रस्ट मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी नेमायचा निर्णय घेतला. यासाठी ट्रस्टने अधिकृत निवेदन जारी करून मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी आवश्यक त्या अटी शर्तींसह अर्ज मागविले आहेत. त्यामध्ये कुठल्याही शाखेचा पदवीधर, व्यवस्थापन कौशल्याचा वीस वर्षांचा अनुभव, 50 ते 70 वय, विशेषतः मंदिर अथवा मोठी संस्था चालविण्याचा अनुभव या अटींचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून त्यांचाही समावेश या अटी शर्तीं मध्ये केला आहे. यामध्ये देणगीच्या रकमेच्या व्यवस्थापनाचाही समावेशाचाही आहे.

    Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra (Trust) invites applications for the position of Chief Executive Officer

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    IRCTC : IRCTC चे नवीन पोर्टल 15 जुलै रोजी येणार; तिकीट बुकिंगमध्ये कॅप्चा आणि पॉप-अपची कटकट संपेल; जाणून घ्या 4 मोठे बदल

    West Bengal : बंगालमध्ये 20 वर्षांनंतर टाटाचे पुनरागमन शक्य:CM सुवेंदू स्वतः करणार प्रकरणाची चौकशी; ममतांच्या आंदोलनामुळे बंद पडला होता प्लांट

    अयोध्येच्या राम मंदिरातल्या चोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची एन्ट्री; SIT ला तपासाचा अहवाल देण्याचे आदेश!!