• Download App
    MSRTC Ashadhi Wari वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाची मोठी घोषणा; 40 भाविक एकत्र आल्यास थेट घरापासून मिळणार विशेष बस; परिवहन मंत्र्यांची माहिती

    MSRTC Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाची मोठी घोषणा; 40 भाविक एकत्र आल्यास थेट घरापासून मिळणार विशेष बस; परिवहन मंत्र्यांची माहिती

    MSRTC Ashadhi Wari

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : MSRTC Ashadhi Wari  आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठू नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली असून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. याच दरम्यान, वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी एसटी महामंडळाने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. आषाढी वारीला पंढरपूरला जाण्यासाठी जर ४० वारकरी एकत्र आले, तर महामंडळाकडून त्यांना थेट विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंढरपुरात ही मोठी घोषणा केली.MSRTC Ashadhi Wari

    पंढरपुरातील एसटी बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आणि महामंडळाच्या सर्व विभागांची आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी आषाढीच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.MSRTC Ashadhi Wari

    ५,५०० गाड्या, ११ हजार चालक-वाहक

    वारकऱ्यांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने यंदा चोख व्यवस्था केली आहे. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपुरात भाविकांची गर्दी विभागण्यासाठी चार तात्पुरती बस स्थानके कार्यान्वित करण्यात आली आहेत. राज्यभरातून वारकऱ्यांना आणण्यासाठी आणि सुखरूप सोडण्यासाठी ५ हजार ५०० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ११ हजार चालक आणि वाहक अहोरात्र कार्यरत असणार आहेत. यंदाच्या वारीमध्ये प्रथमच एक नवा प्रयोग केला जात आहे. वारीच्या काळात उत्कृष्ट आणि प्रामाणिक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे विशेष ‘प्रगती पुस्तक’ (परफॉर्मन्स रेकॉर्ड) तयार केले जाणार आहे.MSRTC Ashadhi Wari



    आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठू नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली असून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. याच दरम्यान, वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी एसटी महामंडळाने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. आषाढी वारीला पंढरपूरला जाण्यासाठी जर ४० वारकरी एकत्र आले, तर महामंडळाकडून त्यांना थेट विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंढरपुरात ही मोठी घोषणा केली.

    पंढरपुरातील एसटी बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आणि महामंडळाच्या सर्व विभागांची आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी आषाढीच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.

    ५,५०० गाड्या, ११ हजार चालक-वाहक

    वारकऱ्यांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने यंदा चोख व्यवस्था केली आहे. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपुरात भाविकांची गर्दी विभागण्यासाठी चार तात्पुरती बस स्थानके कार्यान्वित करण्यात आली आहेत. राज्यभरातून वारकऱ्यांना आणण्यासाठी आणि सुखरूप सोडण्यासाठी ५ हजार ५०० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ११ हजार चालक आणि वाहक अहोरात्र कार्यरत असणार आहेत. यंदाच्या वारीमध्ये प्रथमच एक नवा प्रयोग केला जात आहे. वारीच्या काळात उत्कृष्ट आणि प्रामाणिक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे विशेष ‘प्रगती पुस्तक’ (परफॉर्मन्स रेकॉर्ड) तयार केले जाणार आहे.

    MSRTC Ashadhi Wari 2026: Book a Special Bus from Your Doorstep for 40 Devotees

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Kalyan West : कल्याणमध्ये 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; मलब्याचा ढीग थेट रस्त्यावर, जीव मुठीत धरून नागरिक खिडकीतून पळाले

    Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस केंद्रीय स्तरासाठी योग्य नेतृत्व; 2029 पूर्वी त्यांनी पंतप्रधान व्हावे, संजय राऊत यांचे वक्तव्य

    Navneet Rana : शेरनी अगर शांत है, तो डकारना नहीं भूलती; नवनीत राणांचा विरोधकांना थेट इशारा, स्वाभिमानामुळे राज्यसभेला ठोकर मारल्याचा दावा