• Download App
    Devedra Fadanvis कर्जमाफीची पहिली यादी आज; 68 लाख शेतकऱ्यांना लाभ; तिजोरीवर 4,400 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा

    Devedra Fadanvis : कर्जमाफीची पहिली यादी आज; 68 लाख शेतकऱ्यांना लाभ; तिजोरीवर 4,400 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा

    Devedra Fadanvis1

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Devedra Fadanvis राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी उद्या बुधवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा प्रोत्साहनपर लाभ आता ५० हजारांवरून थेट २ लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने योजनेची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे,अशी माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.Devedra Fadanvis

    लाभार्थी संख्या, आर्थिक भार

    आधीचा आराखडा : पहिल्या टप्प्यात ५६ लाख शेतकरी समाविष्ट होते. त्यासाठी ३३,५८५ कोटींच्या निधीची तरतूद केली गेली होती.
    नव्याने झालेली वाढ : नव्या निकषांनुसार लाभार्थींच्या संख्येत १२ लाखांची भर. राज्य तिजोरीवर ४,४०० कोटींचा अतिरिक्त भार.
    सुधारित विस्तार : लाभार्थी संख्या ६८ लाखांवर. निधीचा बोजा ३७,९८५ कोटी रुपयांवर गेला आहे.



    काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून उद्याच (22 जुलै) प्राथमिक लाभार्थी यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहकार विभागाने यासाठी आवश्यक तयारी केली असून, अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधत ही यादी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    अजित पवार यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

    यावेळी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केल्याची माहिती दिली. या प्रदर्शनात त्यांच्या बालपणापासून राजकीय आणि सामाजिक प्रवासातील विविध क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. अजित पवार यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा उमदा स्वभाव, हास्य आणि नेतृत्वगुण या प्रदर्शनातून अनुभवता येतात. दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हे प्रदर्शन पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

    आंदोलनाचा अधिकार आहे, पण हिंसा मान्य नाही

    दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबत जबाबदाऱ्यांचाही विचार केला पाहिजे. परवानगी घेऊन शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना प्रशासन सहकार्य करेल. मात्र, विनापरवानगी आंदोलन, हिंसा आणि जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.

    ‘फेसलेस’ आंदोलनात काही प्रवृत्ती घुसतात

    फडणवीस म्हणाले की, नेतृत्वविरहित किंवा ‘फेसलेस’ आंदोलनांमध्ये काही स्वार्थी प्रवृत्ती घुसून आंदोलनाचा वापर स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी करतात. दिल्लीतील आंदोलनातही काही राजकीय पक्ष आणि विविध संघटना स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

    पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली

    कालच्या घटनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणे आवडत नाही. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आवश्यक तेवढीच कारवाई केली. पोलिसांनी मोठा संयम दाखवला असून, अधिक गंभीर घटना टाळण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती, असे त्यांनी सांगितले.

    ‘सर्व आंदोलकांवर आरोप नाही, पण काहींचा वेगळा अजेंडा’

    मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व आंदोलकांवर आरोप करणे योग्य नाही. अनेकजण चांगल्या हेतूने आंदोलनात सहभागी झाले असतील. मात्र, काही लोक केवळ अराजकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आंदोलनात सहभागी झाले आहेत. काहींना नीटच्या प्रश्नाशीही संबंध नसून ते स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.

    दिल्लीतील आंदोलन आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था याबाबत सरकार सजग असून, शांततापूर्ण आंदोलनाला संरक्षण दिले जाईल; मात्र हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    First Farmer Loan Waiver List Today: 68 Lakh Farmers to Benefit

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pandharpur : पंढरपुरात दोन लाखांवर भाविक दाखल:दर्शनास लागतात 12 तास, मंदिर परिसरातील 65 एकर मैदानात झाले 650 दिंड्यांचे बुकिंग

    Sikkim Tunnel : सिक्कीममध्ये बोगद्यावर भूस्खलन, 20 मजुरांचे मृतदेह हाती; 5 अजूनही आतच; बोगद्यात मिथेन वायू भरला, मदत करणारे बेशुद्ध

    LTCG Tax : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना LTCG करात दिलासा नाही; सरकारने म्हटले- ते काढण्याचा प्रस्ताव नाही