• Download App
    Vijayatai Rahatkar नाशिकच्या लेकीचा राष्ट्रीय गौरव!!; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांना सर्वोच्च "मानद डी.लिट." पदवी जाहीर

    नाशिकच्या लेकीचा राष्ट्रीय गौरव!!; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांना सर्वोच्च “मानद डी.लिट.” पदवी जाहीर

    – महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि राष्ट्रकार्याची दखल; ३१ जुलै रोजी जयपूर येथे होणार सन्मान

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : नाशिकच्या लेकीचा आणखी एक मानाचा तुरा उंचावला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा श्रीमती विजयाताई रहाटकर यांना राजस्थानमधील प्रतिष्ठित महाराजा गंगा सिंह विद्यापीठ, बीकानेर यांच्यातर्फे “मानद डी.लिट.” (Doctor of Literature – Honoris Causa) ही सर्वोच्च मानद पदवी जाहीर करण्यात आली आहे. समाजसेवा, महिला सक्षमीकरण, सुशासन आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या दीर्घकालीन, परिणामकारक व प्रेरणादायी योगदानाची ही राष्ट्रीय पातळीवरील दखल मानली जात आहे. Vijayatai Rahatkar

    राजस्थानचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या विशेष मंजुरीनंतर हा बहुमान जाहीर करण्यात आला असून, दि. ३१ जुलै २०२६ रोजी जयपूर येथील लोक भवनमध्ये आयोजित विशेष पदवीदान समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.



    – महिला सक्षमीकरण क्षेत्रात कार्य

    महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात विजयाताई रहाटकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य केले आहे. महिलांचे हक्क, सुरक्षितता, स्वावलंबन, न्याय, शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास आणि सामाजिक प्रतिष्ठा या विषयांवर त्यांनी प्रभावी नेतृत्व केले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून देशभरातील असंख्य महिलांना न्याय मिळवून देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि महिलांविषयी संवेदनशील प्रशासन उभारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्यांपुरती मर्यादित नसून, समाजजागृती, कुटुंबव्यवस्था बळकट करणे, महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणे, वंचित घटकांपर्यंत पोहोचणारे उपक्रम आणि राष्ट्रहिताच्या विविध विषयांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यामुळेच त्यांचे कार्य राज्याच्या सीमा ओलांडून राष्ट्रीय स्तरावर आदराने पाहिले जाते.

    – नाशिकच्या भूमीचे संस्कार

    नाशिकच्या संस्कारभूमीत वाढलेल्या विजयाताई रहाटकर यांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्राचे नाव देशभरात उंचावले आहे. त्यांच्या या यशामुळे नाशिककरांसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत असून, हा सन्मान प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाचा आणि प्रेरणेचा क्षण ठरला आहे.

    विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, महिला आणि स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त केले आहे. समाजकार्यात निष्ठा, संवेदनशीलता आणि समर्पण यांचा अखंड प्रवास अखेरीस अशा सर्वोच्च सन्मानात परिवर्तित होतो, याचे विजयाताई रहाटकर हे प्रेरणादायी उदाहरण असल्याच्या भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत. या गौरवामुळे नाशिकच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेलाही नवे अधिष्ठान लाभले असून, समाजसेवेचा मार्ग स्वीकारणाऱ्या नव्या पिढीसाठी हा सन्मान निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

    समारंभ तपशील :

    सन्मान: मानद डी.लिट. (Honorary Doctor of Literature)

    प्रदानकर्ते : महाराजा गंगा सिंह विद्यापीठ, बीकानेर (राजस्थान)

    दिनांक: ३१ जुलै २०२६

    स्थळ : लोक भवन, जयपूर

    “नाशिकच्या लेकीने समाजसेवा, संवेदनशील नेतृत्व आणि राष्ट्रकार्याच्या बळावर मिळविलेला हा सर्वोच्च शैक्षणिक सन्मान संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानात भर घालणारा आहे.”

    Prestigious “Honorary D.Litt.” degree announced for Vijayatai Rahatkar.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राहुल गांधींच्या आंदोलनाला शरद पवारांचा छेद; राहुल गांधींचे लोककल्याण मार्गावर आंदोलन, तर शरद पवार अभिजीत दिपकेच्या भेटीला जंतर – मंतर वर!!

    Ram Mandir : राममंदिर देणगी चोरी- SC म्हणाले- यूपी सरकारने पुन्हा SIT करावी; IPL अधिकाऱ्याला जबाबदारी सोपवा, प्रकरणाचे राजकारण होऊ नये

    CJP च्या आंदोलनात काँग्रेसवाले घुसले; लोककल्याण मार्गावर राहुल गांधी कमरेवर हात ठेवून उभे राहिले!!; परिणाम काय झाला??