• Download App
    Rahul Gandhi CJP च्या आंदोलनात काँग्रेसवाले घुसले; लोककल्याण मार्गावर राहुल गांधी कमरेवर हात ठेवून उभे राहिले!!; परिणाम काय झाला??

    CJP च्या आंदोलनात काँग्रेसवाले घुसले; लोककल्याण मार्गावर राहुल गांधी कमरेवर हात ठेवून उभे राहिले!!; परिणाम काय झाला??

    नाशिक : CJP च्या आंदोलनात काँग्रेसवाले घुसले; लोककल्याण मार्गावर राहुल गांधी कमरेवर हात ठेवून उभे राहिले!!, असे चित्र आज 21 जुलै 2026 रोजी दुपारी दिसले. कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेले आंदोलन सर्व विरोधी पक्षांनी ताब्यात घेतली पाहिजे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी आज सकाळीच केले होते. त्यांच्या पाठोपाठ ममता बॅनर्जी यांनी सुद्धा गरज पडल्यास आपण कोलकात्यामधून उठून कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सामील होऊ, असा इशारा दिला होता. त्यामुळे शिवसेना, तृणमूळ काँग्रेस वगैरे पक्ष पुढे सरसावतील आणि कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन स्वतःच्या ताब्यात घेऊन मोकळे होतील, याची भीती राहुल गांधी आणि काँग्रेस यांना वाटली. त्यामुळे त्यांनी सगळ्यांच्या आधी आंदोलनात उडी मारून कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन स्वतःच्या ताब्यात घेतले. Rahul Gandhi

    अर्थात राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर – मंतरवरच्या मंचावर प्रवेश केला नाही. ते तिकडे फिरकले सुद्धा नाहीत. समाजवादी पार्टीचे ३७ खासदार कालच जंतर – मंतरच्या दिशेने मोर्चा काढून गेले होते, पण तिथे ते फार काळ थांबू शकले नव्हते.

    – लोककल्याण मार्गावर आंदोलन

    राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जंतर मंतरच्या दिशेने फिरकायचा सुद्धा प्रयत्न केला नाही. त्यांनी उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान असलेल्या लोककल्याण मार्गाकडे आपला मोर्चा वळविला. राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणूगोपाल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि पवन खेरा वगैरे नेते लोककल्याण मार्गावर पोहोचले. तिथे त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ जोरदार आंदोलन केले. या सगळ्यांच्या मध्ये राहुल गांधी कमरेवर हात ठेवून उभे राहिले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे राजीनामे एकदम मागितले. राहुल गांधींनी आपल्या ट्विटर हँडल वरून लोककल्याण मार्गावरच्या आंदोलनाचे फोटो शेअर केले.

    – आंदोलन विस्कळीत

    काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी काही वेळ आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून या सगळ्या नेत्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चरणजीत सिंग चन्नी आणि मणिक्कम टागोर यांना उचलून पोलिसांच्या गाडीत ठेवले. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेली घोषणा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अंमलात आणण्याच्या ऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी अमलात आणली. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन स्वतःच्या ताब्यात घेतले. त्यामुळे जंतर – मंतरवरचा प्रसिद्धीचा फोकस डायव्हर्ट होऊन तो लोककल्याण मार्गाकडे वळला. कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा पुरते शिल्लक न राहता ते विरोधकांच्या ताब्यात गेल्याने ते जरा जास्तच विस्कळीत झाले.

     

    Congress leaders  Rahul Gandhi demanding the resignations of Prime Minister and Education Minister Dharmendra Pradhan..

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राहुल गांधींच्या आंदोलनाला शरद पवारांचा छेद; राहुल गांधींचे लोककल्याण मार्गावर आंदोलन, तर शरद पवार अभिजीत दिपकेच्या भेटीला जंतर – मंतर वर!!

    Ram Mandir : राममंदिर देणगी चोरी- SC म्हणाले- यूपी सरकारने पुन्हा SIT करावी; IPL अधिकाऱ्याला जबाबदारी सोपवा, प्रकरणाचे राजकारण होऊ नये

    नाशिकच्या लेकीचा राष्ट्रीय गौरव!!; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांना सर्वोच्च “मानद डी.लिट.” पदवी जाहीर