CJP : कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींना सरकारचे चार वेळा चर्चेचे निमंत्रण; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे निवेदन
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांच्या प्रतिनिधींनी दोन वेळा सरकारशी चर्चा केली. पण दोन्ही चर्चांमधून तोडगा निघू शकला नाही. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींना आत्तापर्यंत किमान चार वेळा चर्चेचे निमंत्रण दिले. पण या पार्टीने सरकारचे निमंत्रण अद्याप तरी स्वीकारलेले दिसले नाही, उलट त्यांनी ते निमंत्रण धुडकावले. त्या पार्टीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्र्यांनीच जंतर – मंतरवर येऊन चर्चा करायची मागणी केली.