Ram Mandir : राम मंदिर देणगी चोरी, अआरएसएसने म्हटले- दोषींना कठोर शिक्षा व्हावी; कोट्यवधी भक्तांच्या विश्वासाचे संरक्षण गरजेचे; पोलिसांनी आरोपी अविनाशची कार जप्त केली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) शुक्रवारी अयोध्या राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणासंदर्भात आपले पहिले निवेदन जारी केले. महासचिव दत्तात्रेय होसाबळे म्हणाले, “रामलल्ला मंदिरातील दानपेट्यांमधून निधीची चोरी होणे दुर्दैवी आहे. यामुळे रामभक्तांच्या भावना आणि श्रद्धेला धक्का बसला आहे. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात जो कोणी दोषी आढळेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.”