नाशिक : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच पंतप्रधानांचे निवासस्थान ७, लोक कल्याण मार्ग येथे अचानक जाऊन आंदोलन केले होते. त्या पाठोपाठ आज दिवसभर त्यांनी सरकारविरुद्ध वातावरण तापवले. याच दरम्यान सरकारने विद्यार्थ्यांना चर्चेसाठी चार वेळा निरोप पाठविले. परंतु, विद्यार्थ्यांनी सरकारचे आवाहन धुडकावले.
त्यानंतर राहुल गांधींनी आज सायंकाळी स्वतःच्या निवासस्थानी काँग्रेसच्या खासदारांना आणि विरोधी पक्षांच्या खासदारांना एकत्र बोलाविले त्यांची एक बैठक घेतली आणि त्यानंतर अचानक त्यांनी आंदोलनाची दिशा आणि मार्ग गांधी स्मृतीस्थळाकडे वळविला. त्यांनी दोन मोठ्या बस आपल्या निवासस्थानी मागविल्या आणि सगळ्या विरोधी खासदारांना त्यामध्ये भरून राहुल गांधी गांधी स्मृतीस्थळाकडे रवाना झाले. राहुल गांधींनी कालच्या आंदोलनाची परवानगी घेतली नव्हती. तशीच त्यांनी आजही आंदोलनाची परवानगी घेतली नाही. ते परवानगी शिवायचं मोठ्या बस मध्ये चढले आणि ती बस गांधी स्मृती स्थळाकडे रवाना केली. त्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावले होते, ते स्वतःहून काढले आणि बसला मार्ग करून दिला.
– अमित शाहांच्या घरावरून मार्गक्रमण
राहुल गांधींच्या बरोबर असलेल्या आंदोलनकर्त्या खासदारांची बस केंद्रीय मंत्री किरण आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानावरून गांधी स्मृतीस्थळाकडे गेली. यावेळी पोलिसांनी स्वतःहून या परिसरातले बॅरिकेट्स हटविले होते.
– राहुल गांधींचा आरोप
मात्र, याच दरम्यान राहुल गांधींनी आपल्याला आणि आपल्या बरोबरीच्या खासदारांना गांधी स्मृती स्थळाकडे जाण्यामध्ये पोलीस अडथळा आणत असल्याचा आरोप केला, पण प्रत्यक्षात पोलिसांनी रस्त्यांवरचे बॅरिकेट साठवून राहुल गांधींच्या दोन्ही बसणं कांडी स्मृतीस्थळाकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला. यावेळी पोलिसांनी राहुल गांधींची कुठलीही बाचाबाची केली नाही.
– “इंडी” आघाडीची फरफट
मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये “इंडी” आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांची राहुल गांधींच्या मागे फरपट झाली. आम आदमी पार्टीचे आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षांचे खासदार वगळता बाकी सगळ्या पक्षांच्या खासदारांना राहुल गांधींच्या मागे बसमध्ये बसावे लागले आणि त्यांच्या मागेच गांधी स्मृती स्थळाकडे जावे लागले तिथे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आंदोलनात सहभागी व्हावे लागले. या मध्ये लालू प्रसाद यादव यांची मुलगी खासदार मिसा भारती, सुप्रिया सुळे आणि अन्य खासदारांचा समावेश होता.
राहुल गांधींनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनात काँग्रेसचे काही खासदार सामील झाले होते. पण बाकीच्या विरोधी पक्षांचे खासदार सामील झाले नव्हते. उलट राहुल गांधी ७, लोककल्याण मार्गावर आंदोलन करत असताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोन्ही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते. पण आज सुप्रिया सुळे राहुल गांधींच्या आंदोलनाला गांधी स्मारकावर गेलेल्या दिसल्या.
Rahul Gandhi, along with INDIA bloc MPs, reach Gandhi Smriti
महत्वाच्या बातम्या
- Punjab Farmers : पंजाबच्या शेतकऱ्यांचे दिल्लीकडे कूच स्थगित; 2 मागण्यांवर सहमती; शंभू-खनौरी बॉर्डर सील
- Remittances : युद्धाचा रेमिटन्सवर परिणाम नाही; विदेशातून भारतीयांनी पाठवले 14 लाख कोटी रु., 12 वर्षांत दुप्पट
- UP Govt : यूपीत पदवीधर विद्यार्थिनींना स्कूटी मिळेल; 330 किमी लांबीचा विंध्य एक्सप्रेस-वे तयार होईल; मंत्रिमंडळाकडून 18 प्रस्ताव मंजूर
- याला म्हणतात, Assignment based काम; CJP आंदोलनाच्या गदारोळात शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!