नाशिक : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांनी ताब्यात घेतले असले तरी प्रत्यक्षात कॉक्रोच आंदोलनाला नेमका पैसा कुठून मिळतोय?? आणि त्यांची कुमक कुठून येते आहे??, याविषयी गंभीर सवाल उत्पन्न झालेत. कॉकरोच जनता पार्टीचे अमेरिकन ओरिजिन त्याचबरोबर सोरोसशी असलेले कनेक्शन याविषयी आधीपासून दाट संशय होताच पण त्याचबरोबर आता उघडपणे काही घटकांनी कॉकरोच आंदोलनात जाहीरपणे सामील व्हायची तयारी दाखवून त्या आंदोलनाचा भेसूर चेहरा सगळ्यांसमोर उघडा पाडला.
– ऑनलाइन फूड ऑर्डर
कॉकरोच जनता पार्टीच्या आजच्या आंदोलनात अचानक आज बातमी समोर आली. जंतर – मंतर वर बसलेल्या आंदोलकांना खायला प्यायला मिळावे म्हणून देशभरातल्या जनतेने ऑनलाईन ऑर्डर करून त्यांना अन्नपदार्थ पाठवल्याची ही बातमी होती. जंतर – मंतरवर वेगवेगळ्या ऑनलाईन फूड प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्यांचे कुरियर बॉईज दिसून आले. त्यांनी बिर्याणी पासून जेवणापर्यंतचे सगळे पदार्थ आंदोलकांना दिले. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीला संपूर्ण देशभरातून सक्रिय पाठिंबा असल्याचे चित्र निर्माण झाले.
– खलिस्तानवाद्याची एक मिलियन डॉलरची देणगी
पण त्याच वेळी कॉकरोच जनता पार्टीला नेमका पैसा कुठून येतो?? आणि त्यांना दुसरी कुमक कुठून येते??, याचे वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसले. कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर – मंतरवरच्या आंदोलनाला खलिस्तानवादी दहशतवादी आणि सिख फॉर जस्टिसचा (SJF) म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने १ मिलियन डॉलर्स देणगी देण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात कॉकरोच जनता पार्टीच्या दाव्यानुसार काही व्यक्ती, व्यक्तींचा समूह आणि काही संघटना कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी पैसा पुरवितात. पण खलिस्तानवादी दहशतवादाने कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला थेट १ मिलियन डॉलर्स देणगी देण्याची घोषणा केल्यामुळे कॉकरोच जनता पार्टीचा पैशांचा शुद्ध दावा उघडा पडला.
– नेपाळी Gen z प्रतिनिधींना भारतात घुसायचेय
त्याचवेळी नेपाळमधून एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समोर आले. नेपाळमध्ये तिथली सत्ता उलझवणाऱ्या Gen z च्या प्रतिनिधींना नेपाळची बॉर्डर ओलांडून भारतात घुसायचे आहे. आणि त्यांना जंतर-मंतरवर येऊन कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सामील व्हायचे आहे, असे तिथले Gen z चे युवक म्हणाले. नेपाळ मधले सरकार आम्ही उलथवून लावले, तसेच भारतातले सरकार आम्ही उलथवून लावू, अशी दमबाजी नेपाळ मधल्या युवकांनी दिलेली दिसली. त्यामुळे सुद्धा कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा भेसूर चेहरा सगळ्या जनतेसमोर उघडा पडला.
Where is the funding for CJP’s agitation coming from?
महत्वाच्या बातम्या
- Ukraine : युक्रेनमध्ये जहाजावर हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारताने म्हटले- व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे निंदनीय
- Andy Burnham Sworn : अँडी बर्नहॅम ब्रिटनचे नवे पंतप्रधान; 10 वर्षांत सातवे पंतप्रधान बनले; पाकिस्तानी वंशाच्या शबाना महमूद अर्थमंत्री होऊ शकतात
- Food Delivery : चीनमध्ये फूड डिलिव्हरी बॉयला सर्वात मोठा साहित्यिक सन्मान; जेवण पोहोचवताना अनेक कविता लिहिल्या
- Ram Mandir : राममंदिर देणगी चोरी- SC म्हणाले- यूपी सरकारने पुन्हा SIT करावी; IPL अधिकाऱ्याला जबाबदारी सोपवा, प्रकरणाचे राजकारण होऊ नये