• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 4 of 1561

    wankhadepravin

    Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा, म्हणाले – त्यांच्यामुळे मराठा-वंजारी समाजात वैर

    मनोज जरांगे पाटील यांनी या विस्तारावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमन चर्चेवर जरांगे पाटील कमालीचे भडकले आहेत. “धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच. मुंडेंना पुन्हा मंत्री केले, तर मराठा समाज अंगावर येईल,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे.

    Read more

    Akshay Kumar : लंडनमध्ये अक्षय कुमार अडखळला; पडता पडता वाचला; सैफ अली खान आणि तैमूर हसले; भारत-इंग्लंडचा सामना पाहण्यासाठी गेले होते

    बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दिसला. यावेळी त्याचा नवीन पांढऱ्या दाढीचा लूक चर्चेत राहिला. त्याने पांढऱ्या आणि बेज रंगाच्या ड्रेससोबत काळ्या केसांचा नवीन लूक स्वीकारला होता.

    Read more

    Donald Trump : इराणने म्हटले- अमेरिकन सैनिकांची वाट पाहत आहोत; खार्गवर ताब्याचा प्रयत्न केला, तर कोणीही जिवंत वाचणार नाही

    इराणने अमेरिकेला कडक इशारा देत म्हटले आहे की, जर त्याने खार्ग बेटावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे सैनिक जिवंत परत येऊ शकणार नाहीत.

    Read more

    QDENGA : भारतात पहिली डेंग्यू लस QDENGA ला मंजुरी; 4 ते 60 वर्षांपर्यंतच्या लोकांना कोणत्याही पूर्व तपासणीशिवाय दिली जाईल

    भारतात पहिल्यांदाच डेंग्यूच्या लसीला मंजुरी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाच्या QDENGA लसीला बाजारात वापरण्याची परवानगी दिली आहे. कंपनीनुसार, ही लस चार ते 60 वर्षांपर्यंतच्या लोकांना दिली जाऊ शकते.

    Read more

    Dhananjay Munde : धनंजय मुंडे म्हणाले, बीडमध्ये खडा पडला तरी पावती माझ्या नावावर:मी संघर्षातून घडलोय, आरोपांना घाबरत नाही

    बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली किंवा कुठलाही खडा पडला, तरी त्याची पावती थेट माझ्या नावावरच फाडली जाते आणि माझ्याविरोधात भाषणे सुरू होतात. केवळ एका व्यक्तीला सातत्याने बदनाम करून तुम्ही गावाची आणि परिसराची प्रगती थांबू शकत नाही. काल माझ्या संपूर्ण जीवनात मी एवढा अस्वस्थ कधीच झालो नव्हतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथील एका कार्यक्रमात बोलताना राजकीय प्रवासातील संघर्षावर भाष्य केले.

    Read more

    Sanjay Shirsat : डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होणार!; संजय शिरसाट म्हणाले- शरद पवारांचा आदेश राष्ट्रवादी मान्य करेल

    डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून विरोधकांमध्ये मतभेद सुरू असतानाच राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) शरद पवार यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचे समर्थन करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिरसाट यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली.

    Read more

    Jantar Mantar : पोलिसांनी आंदोलकांना जंतर-मंतरवरून हटवले; CJPने म्हटले- पोलिसांची निःशस्त्र लोकांना मारहाण; संसद मोर्चावरही लाठीमार

    कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलकांना जंतर मंतरवरून हटवण्यात आले आहे. पोलिसांनी व्यासपीठ मोकळे करून तंबू हटवले आहेत. आंदोलकांना तेथून हुसकावून लावले जात आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी जोरदार लाठीचार्जही केला.

    Read more

    कॉकरोच आंदोलकांवर लाठीमार केल्याचा पोलिसांवर आरोप; पण प्रत्यक्षात आंदोलकांच्या दगडफेकीत 50 पोलीस जखमी; कायदेशीर कारवाईचा पिक्चर अभी बाकी!!

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप झाला त्यावर सगळ्या विरोधी पक्षांनी दिवसभरात राजकीय पोळी भाजून घेतली.

    Read more

    मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्थेला अधिक सक्षम करण्यावर भर; प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या नियामक मंडळाची बैठक पार पडली.

    Read more

    सोनम वांगचूकचा शांततापूर्ण आंदोलनाचा दावा; पण आंदोलकांची दिल्लीत अनेक ठिकाणी मोठी दगडफेक!!

    विद्यार्थ्यांचे आंदोलन शांतपणे सुरू होते, पण पोलिसांनीच त्यांच्यावर लाठीमार केला, असा दावा सोनम वांगचूक याने हॉस्पिटलमध्ये बसून केला. त्याचबरोबर त्याने उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

    Read more

    Tabriz Missile : अमेरिकेचा इराणवर सलग 9 व्या रात्री हल्ला; ‘ताब्रिज’ क्षेपणास्त्र संकुलाला लागली आग, इराकमध्ये अमेरिकन सैनिकाचा मृत्यू

    अमेरिकेने सोमवारी सलग नवव्या रात्री इराणवर हल्ले केले. अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, यात इराणची लष्करी कमांड सेंटर्स, हवाई संरक्षण यंत्रणा (एअर डिफेन्स सिस्टिम्स) आणि क्षेपणास्त्र व ड्रोन प्रक्षेपण स्थळांसह अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

    Read more

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांचा दुहेरी “डाव”; एकीकडे आरोग्य मंत्री नड्डांशी चर्चा, दुसरीकडे पोलिसांवर दगडफेक!!

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी आज दुहेरी “डाव” खेळला. एकीकडे त्यांनी आपले प्रतिनिधी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करायला पाठविले

    Read more

    Luxury Porsche Car : मुंबई कोस्टल रोडवर ‘पोर्शे’चा भीषण अपघात; भरधाव वेगात दुभाजकाला धडक, कारचा पुढचा भाग चक्काचूर; एअरबॅगमुळे दोघांचे वाचले प्राण

    मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडवर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. एका भरधाव पोर्शे या लक्झरी स्पोर्ट्स कारचा ताबा सुटल्याने ती थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, या भीषण अपघातात एक मोठी दैवी किमाया पाहायला मिळाली. कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या प्रवाशाचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.

    Read more

    monsoon session 2026 : पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी पक्षाचे खासदार 15 मिनिटांत बाहेर पडले, नंतर पुन्हा आले, बंडखोर खासदारांना बैठकीत येण्यास विरोध

    मान्सून अधिवेशनाच्या एक दिवस आधी सरकारने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. बैठक सकाळी 11 वाजता संसद भवन ॲनेक्सीमध्ये झाली. बैठकीत काँग्रेस, सपा, टीएमसी, द्रमुक (DMK) सह अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मात्र 15 मिनिटांनंतर विरोधी खासदार बाहेर पडले आणि त्यांनी बैठकीतून सभात्याग केला.

    Read more

    FIFA Final : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! FIFA वर्ल्ड कप फायनलसाठी राज्यातील हॉटेल्स पहाटे 4 वाजेपर्यंत राहणार सुरू

    न्यूयॉर्कमधील स्टेडियमवर मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होणाऱ्या अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील ‘फिफा वर्ल्डकप 2026’ च्या बहुचर्चित अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

    Read more

    MP Cabinet : MP मध्ये UCC बिलाला मंत्रिमंडळाची मंजुरी; विधानसभा अधिवेशनात सादर करण्याची तयारी; दोन राज्यांमध्ये UCC विधेयक मंजूर

    मध्य प्रदेश सरकारने समान नागरी संहिता (युनिफॉर्म सिव्हिल कोड, यूसीसी) लागू करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यूसीसी विधेयक-2026 च्या मसुद्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. आता ते विधानसभेत सादर केले जाईल. विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे.

    Read more

    Country top five brands : देशातील टॉप पाच ब्रँडमध्ये फक्त सॅमसंगची विक्री 2% वाढली नवीन ब्रँड नथिंगची 105% गुगल पिक्सल ची 68% वाढली

    देशातील स्मार्टफोन बाजारात एप्रिल-जून तिमाहीत एक विशेष ट्रेंड दिसून आला. चीनी ब्रँड्सचा बाजारातील वाटा सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर (18% पर्यंत) घसरला. दुसरीकडे सॅमसंग, नथिंग आणि गुगल पिक्सल सारख्या कंपन्यांनी विक्रीत वेगाने वाढ दर्शविली.

    Read more

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने खाल्ली विरोधकांची अख्खी political space; विरोधकांचे आंदोलनही विस्कळीत!!

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने खाल्ली विरोधकांची अख्खी political space सगळ्या विरोधकांचे आंदोलन सुद्धा विस्कळीत!! हेच राजकीय वास्तव आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समोर आले.

    Read more

    नीट पुनर्परीक्षा झाली, निकालही आला, तरीही जंतर-मंतरवर काँग्रेस जनता पार्टीचे आंदोलन; पण केरळच्या पेपर फुटीकडे लक्ष सुद्धा नाही!!

    नीट परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली. त्यावर देशात मोठा गदारोळ झाला. कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतले जंतर – मंतरवर आंदोलन केले.

    Read more

    Nana Patole : वेळेच्या पुढे अन् नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; नाना पटोलेंकडून विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण

    “राजकारणात प्रत्येकाचा एक विशिष्ट काळ असतो. माझे राजकीय गुरू विलासराव देशमुख नेहमी एक गोष्ट सांगायचे की, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काहीच मिळत नाही,” अशा सूचक शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत चौफेर टीका केली.

    Read more

    Navnath Ban : राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली; त्यांना हत्या, बलात्कारासारखे शब्द वापरण्याचा अधिकार नाही- नवनाथ बन

    संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मूळ विचारांशी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेशी गद्दारी केली आहे. त्यामुळे हत्या आणि बलात्कारासारखे शब्द वापरण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. विचारांची हत्या आणि पक्ष संपवण्याचं काम राऊत यांनी केले असा आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तर राहुल गांधींची गुलामगिरी करण्यापलीकडे राऊतांकडे दुसरं कोणतंही काम उरलेलं नाही.

    Read more

    Girish Mahajan : गिरीश महाजन यांचे बनावट ‘AI’ फोटो व्हायरल करणारा गजाआड; सायबर पोलिसांची कारवाई, मोबाईल जप्त आणि फेसबुक खातेही कायमचे बंद

    राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास करत, खोटे फोटो तयार करणाऱ्या बालाजी म्हस्के या मुख्य संशयित आरोपीला पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे.

    Read more

    Gunaratna Sadavarte : शिवाजी पार्कवर आंदोलन करणे बेकायदेशीर; गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरेंच्या आंदोलनावर आक्षेप, कारवाईची केली मागणी

    सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या उपोषणाला आता देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज (१९ जुलै) मुंबईत एका मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, या आंदोलनावरून आता नवा वाद निर्माण झाला असून, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ठाकरेंचे हे आंदोलन बेकायदेशीर ठिकाणी होत असल्याचा दावा करत सदावर्ते यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

    Read more

    Shrikant Shinde : उद्धव ठाकरे कधी जमिनीवर आलेच नाहीत, आता काय येणार? श्रीकांत शिंदेंचा टोला

    उद्धव ठाकरे आतापर्यंत कधीही जमिनीवर आलेले नाहीत, ते आता काय येणार? त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकास्त्र सोडले. तसेच संसदेत एनडीएची ताकद वाढली असून, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 13 खासदार महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न ताकतीने मांडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    Read more

    Laxman Hake : भाजपचा DNA आता ओबीसींचा राहिला नाही, कारखानदारांचा झालाय; लक्ष्मण हाकेंचा घणाघात; नव्या राजकीय पक्षाचीही केली घोषणा

    ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी जनता पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची मोठी घोषणा केली आहे. आगामी काळात ओबीसी समाजाचे सक्षम प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण याच पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती खुद्द लक्ष्मण हाके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

    Read more