विशेष प्रतिनिधी
मुंबई : Gunaratna Sadavarte सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या उपोषणाला आता देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज (१९ जुलै) मुंबईत एका मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, या आंदोलनावरून आता नवा वाद निर्माण झाला असून, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ठाकरेंचे हे आंदोलन बेकायदेशीर ठिकाणी होत असल्याचा दावा करत सदावर्ते यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.Gunaratna Sadavarte
सोनम वांगचुक यांचे नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मात्र २० व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने नेत रुग्णालयात दाखल केले. असे असले तरी त्यांनी रुग्णालयातूनही आपला लढा सुरूच ठेवला आहे. त्यांच्यासोबतच ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनीही उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसैनिकांना करण्यात आले आहे.Gunaratna Sadavarte
गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप काय?
उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनापूर्वी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या या आंदोलनावर कायदेशीर आक्षेप घेतले आहेत. सदावर्ते यांनी दावा केला आहे की, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी आंदोलनासाठी निवडलेले ठिकाण कायदेशीररित्या योग्य नाही. “मुंबईत आझाद मैदानाशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारच्या आंदोलनाला कायद्याने परवानगी नाही. तरीही हे आंदोलन चुकीच्या ठिकाणी केले जात आहे,” असे ते म्हणाले.
शिवाजी पार्क सायलेन्स झोन
सदावर्ते यांनी पुढे म्हटले की, “मी शिवाजी पार्क पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी ठाकरेंच्या या आंदोलनाला कोणतीही अधिकृत परवानगी दिलेली नसल्याचे समजले. शिवाजी पार्क हा ‘सायलेन्स झोन’ (शांतता क्षेत्र) आहे. त्यामुळे निव्वळ राजकारणासाठी नागरिकांची शांतता भंग करणे हा मोठा गुन्हा आहे.”
गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही प्रशासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीर ठिकाणी आंदोलने केल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक जागेचा किंवा मैदानाचा वापर करता येत नाही.”
“याप्रकरणी आपण मुंबईचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अधिकृत पत्र दिले असून, ठाकरे यांच्यावर कलम २२३, २९१, २९२ आणि १९६ अंतर्गत तातडीने गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
Protests at Shivaji Park Are Illegal: Gunaratna Sadavarte Slams Thackeray’s Agitation
महत्वाच्या बातम्या
- Rocket Vikram-1 : भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपण यशस्वी; 450 किमी वर कक्षेत पोहोचले; PM मोदींनी केले अभिनंदन
- Abhishek Banerjee’ : उत्तर परगणामध्ये अभिषेक बॅनर्जींचे पक्ष कार्यालय तोडण्यात आले; नकाशा मंजूर न करता बांधकाम झाले होते
- Trump : अमेरिकेतून 18 हजार भारतीय डिपोर्ट होणार; अपील करण्याचीही संधी नाही; ट्रम्प सरकारने 2025 मध्ये भारतीयांना बेड्या घालून पाठवले होते
- मोदी सरकार संसदेत Delimitation bill मांडणार की नाही??; विरोधक पडले संभ्रमात!!