• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 5 of 1513

    Pravin Wankhade

    Vladimir Putin : रशियन अध्यक्ष पुतिन 25व्यांदा चीनमध्ये पोहोचले; जिनपिंग यांना भेटणार; नुकतेच ट्रम्पही बीजिंगमध्ये येऊन गेले

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मंगळवारी रात्री दोन दिवसांच्या दौऱ्यावर चीनमध्ये पोहोचले. बीजिंग विमानतळावर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी त्यांचे स्वागत केले.

    Read more

    Valmik Karad : वाल्मीक कराडची कारागृहात प्रकृती खालावली; आंबेजोगाई येथे हलवण्याची शक्यता

    मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि प्रमुख आरोपी वाल्मीक कराड यांची बीड जिल्हा कारागृहात अचानक प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना गुप्तांगाच्या भागात तीव्र वेदना आणि गंभीर संसर्गाचा त्रास होत असून त्यामुळे कारागृह प्रशासन आणि वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे. प्रकृती अधिक बिघडू नये म्हणून सध्या त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

    Read more

    Indian Oil : इंडियन ऑइलकडे 1 महिन्याचा कच्च्या तेलाचा साठा; इराणमधील युद्धामुळे अद्यापही 50% पुरवठा बाधित; नफा 81% वाढून ₹15,176 कोटी झाला

    सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) कडे एका महिन्याहून अधिक काळ पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा आहे. कंपनीने मंगळवारी सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याच्या तणावामुळे देशात कच्च्या तेलाची कोणतीही कमतरता भासणार नाही.

    Read more

    NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरण; मोबाईल नाही, कागदही नाही.. फक्त स्मरणशक्तीच्या जोरावर मनीषा मांढरेंनी फोडला पेपर; तपास यंत्रणाही चकित

    नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये संशयित मनीषा मांढरे हिने बायॉलॉजीचा पेपर फोडताना कोणत्याही प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेचा किंवा मोबाईलचा वापर केला नसल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्याचे मूळ आणि तांत्रिक दुवे शोधण्यासाठी न्यायालयाने मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

    Read more

    Money Laundering Case : ईडीने घेतला खरातचा ताबा; मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशी:नाशिक रोड कारागृहातून बंदोबस्तात मुंबईकडे

    मुंबई येथील विशेष न्यायालयाने मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) ७० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग (पैशांची बेकायदेशीर उलाढाल) प्रकरणात अशोक खरात याला अटक करण्याची परवानगी दिली. बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांचा आधीच सामना करत असलेल्या खरातला नाशिक जेलमधून प्रॉडक्शन वॉरंटवर विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. नाशिक रोड कारागृहातून मंगळवारी सकाळी १० वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अशोक खरात याचा ताबा घेतला.

    Read more

    Maharashtra : राज्यात 25,400 मेगावॅट अणुऊर्जेसाठी पहिल्यांदाच 6.5 लाख कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 उद्योग समूह, एका सरकारी महामंडळाशी करार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ आणि ‘संपन्न ऊर्जा राष्ट्र’ संकल्पनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (१९ मे) एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देशातील चार बड्या उद्योगसमूहांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रात तब्बल २५,४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करतानाच तब्बल १ लाख २० हजार तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या ६ लाख ५० हजार कोटी रुपयांच्या अभूतपूर्व अणुऊर्जा करारांवर मंगळवारी मंत्रालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू आणि पूर्णगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे हा प्रकल्प होणार आहेत.

    Read more

    Cabinet : ओबीसी नॉन क्रीमी लेअर मर्यादा 15लाख करण्याची मंत्रिमंडळ उपसमितीची शिफारस; 43 नव्या जातींचा केंद्रीय यादीत समावेशाचा प्रस्ताव

    राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) घटकांना आर्थिक आणि सामाजिक पातळीवर मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण प्रशासकीय पावले उचलली आहेत. नॉन क्रीमी लेअरची वार्षिक उत्पन्न मर्यादा सध्याच्या ८ लाख रुपयांवरून थेट १५ लाख रुपये करण्याची शिफारस ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीने केली असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच अंतिम बैठक होणार आहे.

    Read more

    प्रशांत किशोर संदर्भात बातमी आल्यानंतर लगेच पार्थ पवारांचा खुलासा; पण राष्ट्रवादीतल्या राजकीय गदारोळाबद्दल मात्र मौन!!

    निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संदर्भात नुसती बातमी आली, तर लगेच खासदार पार्थ पवारांनी खुलासा करून टाकला. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या आठवडाभरापासून गदारोळ सुरू आहे, त्यावर मात्र पार्थ पवारांनी मौन बाळगले.

    Read more

    Hormuz : होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने कतारची वायू निर्यात ठप्प; अर्थव्यवस्था 8.6% नी घसरू शकते; येथूनच भारताची सर्वाधिक एलपीजी आयात

    कतार हे पर्शियन गल्फमध्ये (फारसच्या आखातात) असलेले एक छोटे वाळवंटी राष्ट्र होते, जिथे बहुतेक लोक मोती काढणे आणि समुद्राशी संबंधित लहान-सहान व्यवसायांवर अवलंबून होते. नंतर नैसर्गिक वायूने या देशाचे नशीब पूर्णपणे बदलले.

    Read more

    San Diego : अमेरिकेतील सॅन डिएगो मशिदीत गोळीबार, 5 जणांचा मृत्यू; यामध्ये एक रक्षक आणि 2 संशयित; धार्मिक द्वेषाशी संबंधित हल्ल्याची शक्यता

    अमेअमेरिकेतील सॅन डिएगो येथील मशिदीत सोमवारी झालेल्या गोळीबारात 5 लोकांचा मृत्यू झाला. यात एक सुरक्षा रक्षक आणि दोन संशयितांचा समावेश आहे. पोलिसांनुसार, दोन्ही संशयित किशोरवयीन होते. एकाचे वय 17 वर्षे आणि दुसऱ्याचे 19 वर्षे होते. दोघांचे मृतदेह मशिदीजवळ एका वाहनात सापडले. प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःला गोळी मारल्याचे मानले जात आहे.

    Read more

    महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹993 कोटींच्या कामांना मान्यता

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील 6 तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक झाली.

    Read more

    CM Yogi Adityanath : योगी म्हणाले- रस्त्यावर नमाज पढू देणार नाही; प्रेमाने ऐकले तर ठीक, नाहीतर दुसरा मार्ग अवलंबू

    यूपीमध्ये बकरीदच्या एक आठवडा आधी रस्त्यांवर नमाज पठणाबाबत मुख्यमंत्री योगींनी कठोर इशारा दिला. सोमवारी लखनऊमधील एका कार्यक्रमात ते म्हणाले- रस्त्यावर नमाज पठण

    Read more

    राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??

    राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??, असे दोन परखड सवाल विचारायची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस मधल्याच घडामोडींमधून आली.

    Read more

    Railway Ministry Gate : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक; रेल्वे मंत्रालयाच्या गेटवर लावले चित्र; या वर्षी गुजरातमध्ये सुरत-बिलिमोरा दरम्यान धावण्याची अपेक्षा

    भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक सोमवारी समोर आली आहे. दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या गेट क्रमांक 4 वर मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे (MAHSR) चा फोटो लावण्यात आला आहे.

    Read more

    PM Modi : नॉर्वेने PM मोदींना सर्वोच्च सन्मान प्रदान केला; हा त्यांचा 32वा आंतरराष्ट्रीय सन्मान; मोदी म्हणाले- युरोप भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल

    नॉर्वेचे राजे हॅराल्ड पंचम यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांचा सर्वोच्च सन्मान, ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ प्रदान केला आहे. हा नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान मानला जातो.

    Read more

    तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!

    तामिळनाडू मध्ये सगळ्या आम्हा कँटीनच्या नूतनीकरणाचे आदेश काढून मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी एका झटक्यात अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांमध्ये पाचर मारून ठेवली. तामिळनाडूतील अम्मा कॅन्टीन पुन्हा सुरू करून विजय जोसेफ यांनी सामान्य जनतेची सोय केलीच

    Read more

    Suvendu Adhikari : सुवेंदूंची घोषणा- ममता सरकारमधील भ्रष्टाचाराची चौकशी करणार; महिला छळाच्या प्रकरणांची चौकशी एचसीचे न्यायाधीश करतील

    पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत इमाम, मुअज्जिन आणि पुजाऱ्यांना दिले जाणारे मानधन 1 जूनपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

    Read more

    Russian Crude Oil : भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहील; सरकारने सांगितले- अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फरक पडणार नाही

    अमेरिकेकडून मिळणारी निर्बंधांची सूट संपल्यानंतरही भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरूच ठेवेल. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, रशियाकडून कच्च्या तेलाची (क्रूड ऑइल) खरेदी पुढेही सुरूच राहील.

    Read more

    पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!

    नाशिक : पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!, असंच म्हणायची वेळ उत्तर प्रदेश मधल्या काँग्रेस नेत्यांच्या राजकीय कर्तृत्वातून आली. Congress […]

    Read more

    Imran Khan : अमेरिका आणि पाक सैन्याच्या संगनमतातून इम्रान खान यांची उचलबांगडी झाल्याचा खुलासा, इम्रान यांच्या रशिया दौऱ्यामुळे अमेरिका नाराज

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार पाडण्यामागील कारण एका गौप्यस्फोटाद्वारे समोर आले आहे. लीक झालेल्या दस्तऐवजांच्या आधारे असा दावा केला आहे की, इम्रान यांची सत्ता अविश्वास ठरावाने गेली नव्हती. त्यामागे अमेरिकेचा कट व पाकिस्तानी सैन्याची भूमिका होती. इम्रान यांनी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांची भेट घेतली होती. त्याच दिवशी रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला होता.

    Read more

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात १३ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर २० जण गंभीर जखमी झालेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे लग्नघरातील आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

    Read more

    SRPF : SRPF भरतीची लेखी परीक्षा अखेर रद्द! पेपरमध्ये 85 प्रश्न कोचिंग क्लासच्या प्रश्नसंचातील आले होते, आता 24 मे रोजी होणार पुनर्परीक्षा

    राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट क्रमांक ५, दौंड येथील सशस्त्र पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा अखेर अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. गेल्या २ मे रोजी झालेल्या या परीक्षेतील १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खाजगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातातून जसेच्या तसे आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या गंभीर गैरप्रकाराची दखल घेत अप्पर पोलिस महासंचालकांनी ही परीक्षा रद्द केली असून, आता २४ मे २०२६ रोजी नव्याने लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

    Read more

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार पक्षाध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा दावा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. काही लोक पक्षाविषयी मुद्दाम षडयंत्र रचत आहेत. पण आम्ही सर्वजण सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत, असे ते म्हणालेत. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीतून भाजप जाणाऱ्या 40 लोकांची नावे असल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे.

    Read more

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर

    NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता जुळू लागले आहेत. या प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र लेक्चरर मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. आता NEET परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे समोर येत असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्याचे समोर आले आहे.

    Read more

    Koregaon Park : पुण्यात रात्री धावत्या कारमध्ये महिला वकिलावर अत्याचार; कोरेगाव पार्कमधील घटना; पार्टीत भेटलेल्या व्यक्तीचे कृत्य

    विद्येचे माहेरघर आणि महिलांसाठी सुरक्षित शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू परिसरात धावत्या कारमध्ये एका महिला वकिलावर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.

    Read more