विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राष्ट्रीय स्तरावर एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक राजकीय फटका बसला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या ६ खासदारांच्या स्वतंत्र गटाला अखेर लोकसभा सचिवालयाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात विलीन होण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी केल्यामुळे आता हे ६ बंडखोर खासदार तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या शिंदे यांच्या पक्षाचाच अधिकृत भाग बनले आहेत.Uddhav Thackeray
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी पक्षांतर्गत बंडखोरी करत स्वतःचा वेगळा गट स्थापन केला होता. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आणि शिंदे गटात विलीन होण्यासाठी अधिकृत पत्र दिले होते.Uddhav Thackeray
या घडामोडी लक्षात येताच ठाकरे गटाने तातडीने कायदेशीर पावले टाकत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. “आमच्या मूळ पक्षाने कोणत्याही पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नाही. आमचा पक्ष स्वतंत्र असून कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घेतली जावी,” अशी आग्रही विनंती ठाकरे गटाने केली होती. काहीही झाले तरी या बंडखोरांची खासदारकी जाणारच, असा दावाही ठाकरे गटाकडून केला जात होता.
त्यानंतर, बंडखोर सहा खासदारांचा निर्णय लोकसभा सचिवालय यांच्याकडे प्रलंबित होता. आज दिवसभर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत बैठकांचे सत्र पार पडले. त्यानंतर आता सायंकाळी लोकसभा सचिवालयाकडून बुलेटिन जारी करत, उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 6 बंडखोर खासदारांच्या एकनाथ शिंदेंच्या पक्षातील विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे.
लोकसभेत शिंदे गटाचे संख्याबळ वाढले
लोकसभा सचिवालयाच्या या अधिकृत मंजुरीमुळे बंडखोर खासदारांवर टांगती असलेली अपात्रतेची तलवार आता तात्पुरती दूर झाली आहे.लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या लोकसभेतील खासदारांची संख्या अधिकृतपणे १३ झालेली आहे. या फुटील खासदारांच्या गटाचे नेते म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांची घोषणा करण्यात आलेली आहे.
शिंदेंच्या एका कॉलमुळे 6 खासदार बंडखोर
उद्धव ठाकरे यांनी 14 जून रोजी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. 9 पैकी फक्त 4 खासदार पोहोचले. तेव्हाच पक्षात मोठी फूट पडणार हे निश्चित झाले. 16 जून रोजी 6 खासदार दिल्लीला पोहोचले आणि 17 जून रोजी लोकसभा अध्यक्षांना भेटले. त्याच दिवशी बातम्या आल्या की, संजय दीना पाटील आणि ओमप्रकाश निंबाळकर हे दोन खासदार 18 जून रोजी पुन्हा शिवसेना (उद्धव गट) च्या संसदीय बैठकीत जाऊ शकतात, परंतु सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झूम कॉन्फरन्स कॉलवर सर्व खासदारांशी संवाद साधला आणि ते शिवसेना (शिंदे गट) मध्ये विलीन होण्यास तयार झाले.
उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याची 2 प्रमुख कारणे
1. पक्षात संजय राऊत आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप. बंडखोर खासदारांनुसार, संजय यांचे नेत्यांसोबतचे वर्तन योग्य नाही, पण उद्धव त्यांच्या विरोधात काहीही ऐकत नाहीत.
2. खासदारांना आपल्या संसदीय मतदारसंघात कामासाठी निधी मिळत नाही. पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यास आणि क्षेत्रांना भेट देण्यास सांगितले, पण काहीही झाले नाही.
Big Blow to Uddhav Thackeray: Lok Sabha Speaker Approves Merger of 6 Rebel MPs Into Shinde’s Shiv Sena
महत्वाच्या बातम्या
- पोलिसी बळावर टेल्कोचे आंदोलन मोडून काढणाऱ्या पवारांना सोनम वांगचुकचे आंदोलन मोडून काढल्याचे दुःख!!
- सुप्रिया सुळे यांना पुढचे काही दिवस गप्प राहण्याचा सल्ला; पण दिला कुणी आणि कशासाठी??
- आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘फिनोलेक्स’चा पुढाकार; लाखो साहित्याचे वाटप; वारकऱ्यांकडूनही उपक्रमाचे कौतुक
- Japan : बुलेट-ट्रेन प्रकल्प उशिरा झाल्याने जपानचे माजी मंत्री नाराज; म्हटले- आम्ही खूप मेहनत केली, पण भारतीय मंत्र्यांचे वर्तन खराब होते