विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ashok Kharat स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगून निष्पाप भक्तांना आणि श्रीमंत व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या अशोक एकनाथ खरात ऊर्फ ‘भोंदू कॅप्टन बाबा’ याच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठा कायदेशीर फास आवळला आहे. ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात 42.88 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तब्बल 3 हजार पानांचे अवाढव्य आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात भोंदू बाबा अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह एकूण सहा जणांना आरोपी करण्यात आले असून, तब्बल 37 साक्षीदारांचे जबाब न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.Ashok Kharat
अंधश्रद्धेचा बाजार आणि भक्तांची आर्थिक लूट
ईडीने आरोपपत्रात अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा आणि फसवणुकीच्या पद्धतींचा सविस्तर खुलासा केला आहे. भक्तांवर प्रभाव पाडण्यासाठी आणि स्वतःकडे अलौकिक शक्ती असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी खरात रिमोट कंट्रोलने चालणारे कृत्रिम साप आणि वाघाच्या कातड्याचा वापर करायचा. महिला भक्तांना संशयित गुंगीचे औषध दिले जात असल्याचा अत्यंत धक्कादायक खुलासाही आरोपपत्रात करण्यात आला आहे. भक्तांना चमत्कारिक उपचारांचे आमिष दाखवून साध्या चिंचेच्या बिया प्रत्येकी 2 लाख रुपयांना, तर खडे आणि मधाच्या बाटल्या चक्क 9 लाख रुपयांना विकल्या जात होत्या.Ashok Kharat
श्रीमंतांना मृत्यूची भीती
खरातचे मुख्य टार्गेट श्रीमंत व्यावसायिक असायचे. “घरातल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होईल किंवा तुमचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडेल” अशी भीती दाखवून, ‘अवतार पूजा’ व विशेष धार्मिक विधींच्या नावाखाली तो त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या उकळायचा.
142 बेनामी खाती आणि मनी लॉन्ड्रिंगचा कट
लोकांची फसवणूक करून मिळवलेली काळी कमाई पांढरी करण्यासाठी खरात आणि त्याच्या साथीदारांनी विविध सहकारी पतसंस्थांमध्ये तब्बल 142 बेनामी बँक खाती उघडली होती.
समता नागरी सहकारी पतसंस्था (राहाता): 108 बेनामी खाती
जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था (सिन्नर): 34 बेनामी खाती
या खात्यांमधून पैशांची मोठी उलाढाल करून ही रक्कम नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये रिअल इस्टेट आणि आलिशान मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवण्यात आली.
ईडीची मोठी कारवाई: कोट्यवधींची मालमत्ता जप्त
ईडीने खरातच्या विविध ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घबाड हाती लागले आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील खालीलप्रमाणे:
रोख रक्कम: 13.92 कोटी रुपये
विदेशी चलन: 5.18 लाख रुपये
सोने-चांदीचे दागिने: 1.12 कोटी रुपये
बँक ठेवी: 2.60 कोटी रुपये
वाहने: आलिशान मर्सिडीझ-बेंझ कार
एकूण जप्त/गोठवलेली चल मालमत्ता: 17.70 कोटी रुपये
तात्पुरती जप्त केलेली स्थावर मालमत्ता: 19.20 कोटी रुपये
ईडीने आरोपपत्रासोबत आर्थिक व्यवहारांची सर्व कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि मालमत्ता जप्तीशी संबंधित दस्तऐवज न्यायालयात सादर केले आहेत. या 3000 पानांच्या आरोपपत्रातील पुराव्यांमुळे आता या भोंदू बाबाचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, विशेष न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ED Files 3,000-Page Chargesheet Against Fake Baba Ashok Kharat in Cr Scam
महत्वाच्या बातम्या
- पोलिसी बळावर टेल्कोचे आंदोलन मोडून काढणाऱ्या पवारांना सोनम वांगचुकचे आंदोलन मोडून काढल्याचे दुःख!!
- सुप्रिया सुळे यांना पुढचे काही दिवस गप्प राहण्याचा सल्ला; पण दिला कुणी आणि कशासाठी??
- आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘फिनोलेक्स’चा पुढाकार; लाखो साहित्याचे वाटप; वारकऱ्यांकडूनही उपक्रमाचे कौतुक
- Japan : बुलेट-ट्रेन प्रकल्प उशिरा झाल्याने जपानचे माजी मंत्री नाराज; म्हटले- आम्ही खूप मेहनत केली, पण भारतीय मंत्र्यांचे वर्तन खराब होते