• Download App
    Supriya Sule सुप्रिया सुळेंची राजकीय वाटचाल प्रोफेसर एन. जी. रंगा होण्याच्या दिशेने!!

    सुप्रिया सुळेंची राजकीय वाटचाल प्रोफेसर एन. जी. रंगा होण्याच्या दिशेने!!

    नाशिक : सुप्रिया सुळेंची राजकीय वाटचाल प्रोफेसर एनजी रंगा होण्याच्या दिशेने!!, हे अनेकांना विचित्र शीर्षक वाटू शकते पण खरंच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची राजकीय वाटचाल प्रोफेसर एन. जी. रंगा यांच्या राजकीय वाटचालीच्या दिशेने व्हायला सुरुवात झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

    – मोदी – पवार संबंध आणि सुप्रिया सुळे

    आत्तापर्यंत सुप्रिया सुळे यांनी ज्या पद्धतीने केंद्रातले राजकारण केले ते पाहता, लवकरच त्या प्रोफेसर एन. जी. रंगा यांच्या रांगेत जाऊन बसतील, अशी चिन्हे दिसत आहेत. शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) जाणार आणि सुप्रिया सुळे यांचे political settlement करून घेणार अशा बातम्या 2014 पासून 2026 पर्यंत अनेक वर्षे येऊन गेल्या. पण शरद पवारांनी उघडपणे कधीच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या NDA त प्रवेश केला नाही आणि गेल्या 12 वर्षांमध्ये सुप्रिया सुळे यांचे political settlement होऊ शकले नाही. गेल्या 12 वर्षांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंख्य घडामोडी घडल्या. त्यांच्या राजकारणाविषयी आणि मोदी – पवार संबंधांविषयी अनेक कंड्या पिकल्या. दोघांच्याही राजकीय संबंधांमध्ये अनेक चढ उतार झाले, पण अदानी प्रकरणात मोदींना हवा तसा काँग्रेसला आणि विशेषतः राहुल गांधींना foul करण्यापेक्षा दुसरे कुठलेही काम पवारांनी मोदींना अनुकूल असे केलेले दिसले नाही.

    – सुप्रिया सुळेंची political settlement

    बाकी मोदींच्या महत्त्वाच्या राजकीय निर्णयांमध्ये पवार अडथळा ठरू शकत नव्हते, त्या पद्धतीने ते अडथळा ठरले सुद्धा नाहीत. त्यापलीकडे मोदी आणि पवार यांचे कुठले राजकीय साहचर्य राहिल्याचे दिसले नाही. मोदींच्या दृष्टीने पवारांची political nuisance value फक्त काँग्रेस पुरती मर्यादित राहिली, त्यापलीकडे नाही. त्यामुळेच मोदींनी कधी पवारांशी राजकीयदृष्ट्या मर्यादेपलीकडे जुळवून घेतले नाही. त्यामुळेच पवारांना अपेक्षित असलेली सुप्रिया सुळे यांची political settlement होऊ शकली नाही. म्हणजेच त्या आत्तापर्यंत कधीच केंद्रीय मंत्री होऊ शकल्या नाहीत.

    – प्रोफेसर एन. जी. रंगा यांची राजकीय कारकीर्द

    याचाच अर्थ सुप्रिया सुळे यांची राजकीय वाटचाल प्रोफेसर एन जी रंगा यांच्यासारखी राहिली. प्रोफेसर एन. जी. रंगा हे अखंड आंध्र प्रदेश मधले काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी नेहरूंपासून ते राजीव गांधींच्या कारकिर्दीपर्यंत दीर्घ कारकीर्द पाहिली. ते काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. त्याचबरोबर एकाच वेळी नेहरूंशी चांगले संबंध आणि त्याच वेळी चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याशी सुद्धा चांगले संबंध अशी रंगा यांची दुहेरी राजनीती होती. ते संसदेवर तब्बल आठ वेळा निवडून गेले होते. त्यापैकी त्यांची फक्त एकच टर्म राज्यसभेची होती. ते बाकीच्या सात टर्म लोकसभेचे खासदार राहिले. त्यांनी नेहरू ते इंदिरा गांधी अशा सर्व पंतप्रधानांचा कार्यकाळ जवळून पाहिला, पण यापैकी कुठल्याही पंतप्रधानाने त्यांना कधीही केंद्रात मंत्रिपद दिले नव्हते. प्रोफेसर एन‌. जी. रंगा हे नेहमीच आदर्श संसदपटू बनून राहिले. त्यांनी पोटतिडकीने आंध्र प्रदेश मधल्या समस्यांना लोकसभेत वाचा फोडली. अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर ते नेहमीच लोकसभेत बोलले. काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेवला, पण ते कधीही केंद्रीय मंत्री होऊ शकले नाहीत. याचा अर्थ त्यांची केंद्रीय मंत्री व्हायची इच्छा नव्हती असा नव्हे, पण कुठल्याच पंतप्रधानाने त्यांना आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली नाही, असा त्याचा अर्थ होता.

    – सुप्रिया सुळे यांची राजकीय कारकीर्द

    सुप्रिया सुळे यादेखील 2006 पासून 2026 पर्यंत म्हणजे तब्बल 20 वर्षे संसदेच्या सदस्य आहेत. 2006 ते 2009 या तीन वर्षांच्या कालावधीत त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. ती त्यांच्या संसदीय कारकिर्दीची सुरुवात होती. त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्या बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. तेव्हापासून 2024 च्या निवडणुकांपर्यंत त्या लोकसभेच्या खासदार आहेत. 2029 पर्यंत त्यांच्या खासदारकीची मुदत आहे. सुप्रिया सुळे या सुद्धा आदर्श संसदपटू आहेत. अनेकदा त्यांचे समर्थक त्यांचा उल्लेख “संसदरत्न” असा करत असतात. कारण त्यांना तो पुरस्कार अनेकदा मिळालाय. त्या लोकसभेत राष्ट्रीय प्रश्नांवर अनेकदा पोटतिडकीने बोलतात, पण शरद पवारांच्या political adjustment च्या उणिवांमुळे किंवा मर्यादांमुळे सुप्रिया सुळे यांना आत्तापर्यंत केंद्रीय मंत्री होता आले नाही.

    2014 मध्ये त्यांना तशी संधी आल्याच्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या, पण त्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य होते, याविषयी आता संशय दाट झालाय. कारण मोदींना त्यावेळी सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्री करायचे असते, तर त्या केव्हाच केंद्रीय मंत्री होऊन बसल्या असत्या. पण 2014 ते 2026 अशा 12 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत त्या खासदार राहिल्या, पण कधी केंद्रीय मंत्री होऊ शकल्या नाहीत. यामागे त्यांच्या वैयक्तिक इच्छेपेक्षा मोदी आणि पवार यांच्यातले राजकीय संबंध, त्यातले चढ-उतार, पवारांची political nuisance value आणि तिचा मोदींना होणारा उपयोग यांचाच संबंध मोठा राहिला. सुप्रिया सुळे यांच्या वैयक्तिक इच्छेचा त्यामध्ये कुठलाच वाटा राहिला नाही. या अर्थाने सुप्रिया सुळे यांची राजकीय कारकीर्द प्रोफेसर एन. जी. रंगा यांच्या राजकीय कारकिर्दीशी राजकीय समानत्व दाखविणारी राहिलीय. असे निदान आत्तापर्यंत तरी दिसून आलेय.

    Supriya Sule’s political journey is heading towards becoming a Professor N. G. Ranga!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rocket Vikram-1 : भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपण यशस्वी; 450 किमी वर कक्षेत पोहोचले; PM मोदींनी केले अभिनंदन

    Abhishek Banerjee’ : उत्तर परगणामध्ये अभिषेक बॅनर्जींचे पक्ष कार्यालय तोडण्यात आले; नकाशा मंजूर न करता बांधकाम झाले होते

    मोदी सरकार संसदेत Delimitation bill मांडणार की नाही??; विरोधक पडले संभ्रमात!!