नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुढचे काही दिवस गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे. पण सध्याच्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेमका कुणी आणि कशासाठी सल्ला दिला??, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली. स्वतः सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात ट्विट करून स्पष्ट शब्दांमध्ये खुलासा केला.
सुप्रिया सुळे यांचे ट्विट असे :
माझ्या घशाच्या आणि आवाजाच्या समस्येबाबत मी नुकतीच डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या घशात थोडी सूज असल्याचे निदान केले असून, मला पूर्णपणे ‘व्हॉइस रेस्ट’ (आवाजाला पूर्ण विश्रांती) घेण्याचा सल्ला दिला आहे. यापुढे माझी ‘व्हॉइस थेरपी’ होणार असून, पुढील १-२ आठवडे भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळण्याचा सल्ला मला देण्यात आला आहे. आपण परिस्थिती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद
- संसदेच्या अधिवेशनात…
याचा अर्थ सुप्रिया सुळे यांना वैद्यकीय कारणासाठी गप्प राहण्याचा सल्ला मिळाला असून त्या पुढचे एक दोन आठवडे तरी पत्रकार परिषद घेणे टाळणार आहेत किंवा त्या सार्वजनिक मंचावर भाषण करणे टाळणार आहेत.
सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनात डीलिमिटेशन बिलाबरोबरच अनेक महत्त्वाची बिले सादर होणार आहेत. परंतु सुप्रिया सुळे यांना वैद्यकीय कारणासाठी का होईना, पण गप्प राहण्याचा सल्ला मिळाल्यामुळे त्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभेत अनेक बिलांवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या ऐवजी अन्य खासदारांना राष्ट्रवादीची भूमिका तिथे मांडावी लागेल.
- राजकीय हालचाली सुप्त, पण स्पष्टीकरण नाही
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर जुळवून घेणार. भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या सल्ल्यानुसार संसदेत राजकीय वर्तणूक ठेवणार म्हणजेच महत्त्वाच्या बिलांवर सरकारच्या बाजूने मतदान करणार किंवा मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून सरकारच्या सोयीची भूमिका घेणार ज्आणि त्या बदल्यात सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्री पद मिळणार, अशी चर्चा गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीय हवेत होती. ती चर्चा आजही कायम आहे.
पण भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी अद्याप तरी सुप्रिया सुळे यांच्या कथित केंद्रीय मंत्रिपदाला अजून तरी हिरवा कंदील दाखविल्याचे अधिकृत वृत्त आलेले नाही. त्यातच सुप्रिया सुळे यांना वैद्यकीय कारणासाठी का होईना, पण गप्प राहण्याचा सल्ला मिळाल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या राजकीय हालचाली सुप्तपणे सुरू राहतील, पण त्यांचे स्पष्टीकरण द्यायला त्या निदान एक-दोन आठवडे तरी उपलब्ध नसतील. पण त्या सोशल मीडियावर उपलब्ध राहू शकतील. कारण त्यांनी आपण याच एक-दोन आठवड्यांच्या कालावधीत सोशल मीडियापासून दूर राहू, असे ट्विट केलेले नाही.
Supriya Sule advised to remain silent for the next few days.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राचा ड्रग्स विरोधी लढा अधिक तीव्र; व्यूहरचना आणि कृती आराखड्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना
- बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी राजा आणि वजीरालाच हात घातला, पण दिल्लीतल्या की…??
- Sant Rampal’ : रामपाल म्हणाला-राम मूर्तीत प्राण असते तर चोर पकडले गेले असते; रामाने चोरांना बाण का मारला नाही
- Sonam Wangchuk : दिल्ली हायकोर्टाने म्हटले- प्रत्येक जीव महत्त्वाचा; केंद्र-दिल्ली सरकारने दररोज वैद्यकीय तपासणी करावी