नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शोकोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोनम वांगचुकला पोलिसांनी जंतर-मंतर वरून हलविल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली पण राष्ट्रवादीतल्या संभाव्य फुटी बद्दल मात्र प्रश्न उडवून लावून त्यांनी मौन बाळगले.
शरद पवारांनी काल बारामती तालुक्यातल्या सुपे इथल्या विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. त्यावेळी एका विद्यार्थिनीने त्यांच्यासमोर आणलेल्या बुद्धिबळाच्या पटावरचे राजा आणि वजीर त्यांनी हलविले, पण शरद पवारांनी जणू काही दिल्लीतल्या राजकीय बुद्धिबळाच्या पटावरचे राजा आणि वजीर हलविले, असा आव आणून मराठी माध्यमांनी बातम्या दिल्या. पण प्रत्यक्षात दिल्लीतल्या छोट्या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या शरद पवारांनी त्यांच्याच पक्षातल्या संभाव्य फुटीबद्दल साधी प्रतिक्रिया व्यक्त करणे सुद्धा टाळले.
– केजरीवालांचा संताप, पवारांचा इशारा
राजधानी नवी दिल्लीत गेल्या २० दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुकला दिल्ली पोलिसांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशानुसार जंतर – मंतर वरून हलवून सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावरून देशाच्या विविध राजकीय पक्षांमध्ये प्रतिक्रिया उमटल्या. अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांनी याविषयी संताप व्यक्त केला. सोनम वांगचुक याला पोलिसांनी जबरदस्तीने जंतर-मंतर वरून हटविले, ही मोदी सरकारच्या राजकीय भवितव्यासाठी चांगली गोष्ट घडलेली नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला. देशाच्या शिक्षण व्यवस्थेत मोदी सरकारने सकारात्मक बदल केले नसल्याने ही परिस्थिती ओढविल्याची टीका सुद्धा त्यांनी केली.
– सत्तेसाठी राष्ट्रवादी उतावीळ
पण सध्या राष्ट्रवादीत सत्ता नसल्यामुळे आणि सत्ता असल्यामुळे दोन्ही गोष्टींमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. अनेक नेते भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसायला उतावळे झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या आठ खासदारांमध्ये आणि दहा आमदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतल्याबरोबर सुप्रिया सुळे यांना केंद्रात आणि जयंत पाटील यांना राज्यात मंत्री पद मिळणार आहे असल्या चर्चा सुरू आहेत.
– राष्ट्रवादीतल्या फुटीचा प्रश्न पवारांनी उडवून लावला
मात्र या महत्त्वाच्या प्रश्नावर आज शरद पवार यांनी मौन बाळगणे पसंत केले. किंबहुना त्यांनी त्यासंदर्भातल्या प्रश्न आज हा विषय चर्चेचा नाही असे म्हणून एका वाक्यात उडवून लावला. सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी फूट पडून आठ पैकी पाच खासदार भाजपच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता आहे. मात्र, शरद पवारांनी त्या प्रश्नावर उत्तर देणे टाळले. त्यामुळे दिल्ली पासून मुंबई पर्यंतच राजकीय वर्तुळात शरद पवारांच्या भूमिकेविषयी पुन्हा एकदा संशय निर्माण झाला. एएनआय सारख्या विशासार्ह वृत्तसंस्थेने शरद पवारांच्या मौनाची दखल घेऊन त्याचा राजकीय अर्थ सांगणारी बातमी प्रसारित केली.
Sharad Pawar’s reaction to Sonam Wangchuk being removed from Jantar Mantar.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राचा ड्रग्स विरोधी लढा अधिक तीव्र; व्यूहरचना आणि कृती आराखड्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना
- बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी राजा आणि वजीरालाच हात घातला, पण दिल्लीतल्या की…??
- Sant Rampal’ : रामपाल म्हणाला-राम मूर्तीत प्राण असते तर चोर पकडले गेले असते; रामाने चोरांना बाण का मारला नाही
- Sonam Wangchuk : दिल्ली हायकोर्टाने म्हटले- प्रत्येक जीव महत्त्वाचा; केंद्र-दिल्ली सरकारने दररोज वैद्यकीय तपासणी करावी