सुप्रिया सुळे यांना पुढचे काही दिवस गप्प राहण्याचा सल्ला; पण दिला कुणी आणि कशासाठी??
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुढचे काही दिवस गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुढचे काही दिवस गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट, आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना कमोडिटी करून ठेवलेय आणि त्यांना विनोदाचा विषय करून ठेवलेय, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नाशिक मधल्या कार्यक्रमात व्यक्त केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीनंतर तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या वृत्तामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. खासदार Supriya Sule यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत हा महिलांशी केलेला विश्वासघात असल्याचा आरोप केला आहे.
देशासमोर सध्या निर्माण झालेले भीषण आर्थिक आणि ऊर्जा संकट पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आपल्या सुरक्षेसाठी शासनाकडून देण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आणि शासकीय वाहने तातडीने काढून घेण्यात यावीत, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला अधिकृत आवाहन केले असून, त्यांच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या, असे आवाहनही सुळे यांनी केले आहे.
सुप्रिया सुळे यांच्या भाषणात भावनांचा महापूर; पण मुख्यमंत्री येण्यापूर्वीच बारामतीतल्या स्टेजवरून गेल्या निघून!!, ही राजकीय घटना आज बारामतीत घडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. “२०२३ मध्ये हे बिल मंजूर झाले आणि आता आपण २०२६ मध्ये आहोत. अडीच-तीन वर्षे उलटूनही महिलांना अद्याप ३३ टक्के आरक्षण का मिळाले नाही?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याची खंत व्यक्त केली आहे. भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे का जाऊ वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून व व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याचे सिद्ध होते. या प्रकरणी सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही गंभीर आत्मचिंतन केले पाहिजे, असे त्या म्हणाल्यात.
भोंदू बाबा अशोक खरात बरोबर “पवार संस्कारितांचे” कारनामे; पण सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस तर दाभोळकरांचा वारसा सांभाळणारे!!, असला प्रकार आज समोर आला.
\पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचे पडसाद भारतातही उमटत असून एलपीजी गॅसच्या उपलब्धतेबाबत अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत. घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलिंडर मिळण्यात अडथळे येत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘संस्कृती’ आणि ‘सौहार्द’ पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आज संध्याकाळी साडेसहा वाजता ‘मातोश्री’वर जाणार आहेत.
राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही अधिकृत घोषणा केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सोशल मीडियाद्वारे महाविकास आघाडीच्या एकजुटीचा पुनरुच्चार करत या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, शरद पवार उद्या स्वतः अर्ज भरण्यासाठी विधानमंडळात जाण्याची शक्यता कमी असून, निवडणूक अधिकारी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य असेल, तर त्याची गांभीर्याने चौकशी झालीच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. रोहितने अभ्यासपूर्वक पाठपुरावा केला असून त्याचा मला अभिमान वाटतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवारांच्या अपघातामागील सत्य समोर यावे, हीच आमची अपेक्षा आहे. कोणतीही शंका राहू नये म्हणून तपास प्रक्रिया पारदर्शक असणे अत्यावश्यक असल्याचे सुळे यांनी नमूद केले.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या शंका-कुशंकांना आता नवे वळण मिळाले आहे. अपघात की घातपात, या चर्चेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडूनही काही शंका व्यक्त करण्यात आल्या.
अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबीयांवर भावनिक आघात झाला असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, शरद पवारांची प्रकृती आता स्थिर आणि चांगली आहे, तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले. आज एकीकडे आनंद आहे, तर दुसरीकडे प्रचंड दु:ख आहे. दादांचं वय जाण्याचं नव्हतं. ते आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही, असे त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवारांवर आता मोठी जबाबदारी आल्याचेही त्यांनी नमूद केले.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर बारामतीतल्या प्रत्येक घडामोडी मध्ये पुढे पुढे करणाऱ्या सुप्रिया सुळे या सुनिता पवार यांच्या शपथविधीनंतर मात्र पवार कुटुंबातील घडामोडी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींपासून अचानक “दूर” झाल्याने त्यांच्याभोवतीचे राजकीय गूढ वाढले.
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचे घाटत असतानाच, त्यात मध्येच राष्ट्रवादीचा ऐक्याचा खोडा घालायचा आणि सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे सरकवायचे, असा डाव राष्ट्रवादीतले काही नेते खेळत असल्याचे उघड झाले.
महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. हे कार्यकर्ते आमच्या मोठ्या निवडणुकांमध्ये राबतात. त्यामुळे त्यांच्या निवडणुकांमध्ये नेत्यांनी ऐकायचे असते
सुप्रिया सुळेंचे केंद्रीय मंत्रिपद अजितदादांनी फेटाळले; दुसऱ्या फुटीच्या भीतीने दोन राष्ट्रवादींचे ऐक्यही टाळले!!, असे आज पुणे महापालिकेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घडले.
राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. या दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार का? असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे.
राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या गदारोळात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी महायुती तुटत असतानाच पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती फिस्कटल्याने वातावरण अधिकच तापले आहे.
गौतम भाई आणि प्रीती भाभी हे माझ्यासाठी केवळ पाहुणे नसून, ते माझ्या हक्काच्या मोठ्या भावासारखे आणि वहिनीसारखे आहेत. गेल्या 30 वर्षांपासून आमचे प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अदानी कुटुंबाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात गौतम अदानी आणि प्रीती अदानी यांचे स्वागत करताना त्या बोलत होत्या.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची युती होण्याची शक्यता आहे. पण शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाही, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर जगपात काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.