• Download App
    Supriya Sule राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार कमोडिटी आणि विनोद विषय झाल्याची सुप्रिया सुळे यांना खंत; पण त्यांची कमोडिटी नेमकी केली कुणी??

    राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार कमोडिटी आणि विनोद विषय झाल्याची सुप्रिया सुळे यांना खंत; पण त्यांची कमोडिटी नेमकी केली कुणी??

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना कमोडिटी करून ठेवलेय आणि त्यांना विनोदाचा विषय करून ठेवलेय, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नाशिक मधल्या कार्यक्रमात व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ खासदारांना आता फक्त मनसेत पाठवायचे राहिलेय. बाकी सगळ्या पक्षांमध्ये पाठवून झाले. आम्ही नाराज असलो, तर त्यावर आहोत. कारण आता ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस काम करणे एवढेच म्हणायचे राहिलेय, असे सुप्रिया सुळे नाशिक मधले एका कार्यक्रमात म्हणाल्या. Supriya Sule

    – खासदार फुटण्याची वातावरण निर्मिती

    सुप्रिया सुळे यांची खंत वरवर पाहता योग्यच आहे. कारण मराठी माध्यमांसह अन्य माध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची विक्री होण्याची वातावरण निर्मिती आधीच करून टाकली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार फुटले. त्या पाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुद्धा फुटणार आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला पाठिंबा देऊन मोकळे होणार या बातम्या आता शिळ्या सुद्धा झाल्या. पण भाजपने एकनाथ शिंदेंच्या मार्फत उद्धव ठाकरेंच्या फुटीर खासदारांना सत्तेचे गाजर दाखविले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीर खासदारांना सत्तेच्या मृगजळाच्या जवळ आणून ठेवले. त्यांची “खरेदी” करायचीच भाजपने नाकारले. त्यामुळे त्यांची अवस्था लटकलेल्या त्रिशंकू सारखी झाली.

    पण सुप्रिया सुळे यांनी त्याच गोष्टीचे वर्णन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना कमोडिटी करून ठेवले. त्यांना विनोदाचा विषय करून ठेवले, अशा भाषेत केले.



    – शरद पवारांची राजकीय वर्तणूक संशयास्पद

    पण मूळात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार कमोडिटी आहेत आणि ते विनोद विषय आहेत, असे नेमके कशामुळे घडले??, तर ते शरद पवारांच्या राजकीय वर्तणुकीतून घडून आले. मूळात शरद पवारांनी एकीकडे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची पुडी सोडून दुसरीकडे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वतःची राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतली. त्यांनी “इंडी” आघाडीत राहून नरेंद्र मोदींशी जवळीक ठेवली. अदानींच्या मुद्द्यावर त्यांनी राहुल गांधींना साथ देण्याऐवजी नरेंद्र मोदींची साथ देणे पसंत केले. त्यामुळे शरद पवारांची राजकीय वर्तणूक कायमच संशयास्पद राहिली. एकाच वेळी ते विरोधी पक्षात राहिले आणि त्याचवेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाला डोळे मारले. त्यामुळे शरद पवार भाजप बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्याची टीका झाली. त्यावर शरद पवारांनी किंवा सुप्रिया सुळे यांनी कधी प्रतिवाद केला नाही. उलट सशक्त लोकशाहीमध्ये सर्वांची संवाद हवा विरोधकांशी सुद्धा संवाद हवा, असे तत्त्वज्ञानाचे डोस पाजले.

    – ममता आणि उद्धव प्रामाणिकपणे भाजप विरोधात

    तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचाही पक्ष फुटला त्यांचे खासदार आणि आमदार निघून गेले पण ममता बॅनर्जी यांनी भाजपशी संघर्ष करण्याची भूमिका सोडली नाही उद्धव ठाकरेंनी सुद्धा भाजपशी संघर्ष करण्याची भूमिका सोडली नाही त्यामुळे ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे हे कमोडिटी आहेत किंवा विनोद विषय झाले आहेत, असे त्यांना म्हणावे लागले नाही. ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे हे पक्ष फुटी नंतर सुद्धा आपापल्या मूळ भूमिकांवर ठाम राहिले. त्या उलट शरद पवारांनी सगळ्या डगरींवर हात ठेवण्याचे डाव खेळल्यामुळे त्यांचे खासदार कमोडिटी आहेत, अशा शब्दांमध्ये त्यांचे विनोद विषय झाले. लोकांनी त्यांच्यावर ज्योक बनविले. शरद पवार “इंडी” आघाडीत राहून मोदींचेच काम करतात, ही बाब आता सर्वसामान्य जनतेपासून सुद्धा लपून राहिलेली नाही. शरद पवार जातील, तिथे माती करतील, असेच लोक त्यांच्या अनुभवातून बोलत असल्यास नवल नाही, पण त्यापलीकडे जाऊन शरद पवारांच्या राजकीय वर्तणुकीमुळे त्यांच्या खासदारांवर कमोडिटी व्हायची वेळ आली आणि ते विनोद विषय बनून गेले. सुप्रिया सुळे यांनी त्याविषयी खंत जरूर व्यक्त केली, पण त्यांनी त्याची खरी कारण मीमांसा केली नाही.

    Supriya Sule regrets that NCP MPs have become a commodity and a subject of jokes

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना केले “मुख्यमंत्री”!!

    Eknath Shinde : सभागृहात चर्चा कमी, पायऱ्यांवरच शिव्याशाप जास्त; एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर साधला निशाणा

    CM Devendra Fadnavis : अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीआयडी, AAIB द्वारे तपास सुरू; अहवालानंतर CBIकडे तपास, CM फडणवीस यांची माहिती