• Download App
    CM Devendra Fadnavis अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीआयडी, AAIB द्वारे तपास सुरू; अहवालानंतर CBIकडे तपास, CM फडणवीस यांची माहिती

    CM Devendra Fadnavis : अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीआयडी, AAIB द्वारे तपास सुरू; अहवालानंतर CBIकडे तपास, CM फडणवीस यांची माहिती

    CM Devendra Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : CM Devendra Fadnavis  विधानसभेतील भाषणानंतर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिसिंग लिंकवरील पुलाबाबत पसरवलेल्या खोट्या माहितीवर संताप व्यक्त करत, त्यांनी आधी वापरलेल्या ‘भाडे की टट्टू’ या शब्दाचा संदर्भ स्पष्ट करत ‘भाटक गदर्भ’ आणि ‘सुपारीबाज’ असे शब्द वापरले. तसेच, राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना ‘मिमिक्री आर्टिस्ट’ म्हणत टोला लगावला आणि “ते स्टँडअप कॉमेडियन असते तर इतरांना मार्केट राहिले नसते,” अशी कोपरखळी मारली. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचा तपासाबाबत फडणवीसांनी सांगितले की, AAIB च्या अहवालानंतर CBI तपास हाती घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.CM Devendra Fadnavis

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, परवा मी विधानसभेत भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली. पण मी अतिशय स्पष्टपणे सांगितले की मिसिंग लिंकवर जो काही तो पूल आहे, ब्रिज आहे, टनेल आहेत, त्यांना एकही तडा गेलेला नसताना, कोणतेही नुकसान झालेले नसताना पैसे पाण्यात गेले म्हणणे सुरू झाले. हा माझा अपमान आहे? हा महाराष्ट्राचा अपमान आहे. पण मी बोलता बोलता हिन्दीमध्ये बोललो, काहींना त्याचेही दुःख झाले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृतपणे बोलले पाहिजे. त्यानंतर मी अभ्यास केला आणि आता मी ‘भाडे की टट्टू’ च्या ऐवजी ‘भाटक गदर्भ’ म्हणतो. कोणाला समजले नसेल तर सुपारीबाज. मी टोपी फेकली होती, अनेकांना का लागली मला समजले नाही, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंचे नाव न घेत निशाणा साधला आहे.CM Devendra Fadnavis



    पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपले मिमीक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का भाषण केले? पण मला काही अडचण नाही, ते आमचे मित्र आहेत. राजकारणात त्यांच्याकडून काही धोका नाही. पण आनंद आहे की ते राजकारणात आहेत. पण ते मिमीक्री आर्टिस्ट झाले असते तर एकाही स्टँडप कमेडियनला मार्केट राहिले नसते.

    महाराष्ट्र आजही सुरक्षित

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, दर वेळेसच आपला अंतिम आठवड्याचा प्रस्ताव कायदा आणि सुव्यवस्थेवर असतो. या सभागृहात अनेकवेळा चुकीचे आकडे मांडले जातात. महाराष्ट्राच्या गुन्हेगारीची आकडेवारी जास्त आहे असे सांगितले जाते. क्राइम रेट कसा मोजला जातो? तर प्रती एक लाख लोकसंख्येनुसार मोजायचा असतो. आपण आता जर विचार केला, देशातल्या राज्यांमध्ये आपण 7 व्या क्रमांकावर आहोत. गुन्हेगारीत आपले राज्य पहिले असे म्हणणे चुकीचे आहे. महिलांच्या विरोधात जे अपराध आहेत, त्यात 9 व्या क्रमांकावर आहोत. लहान बालकांच्या विरोधातील गुन्हे, यात आपण 7 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मला असे वाटते की आपण जर बघितले तर जे काही रेपचे गुन्हे आहेत, त्यात महाराष्ट्र 17 व्या क्रमांकावर आहे. मी कुठल्याही गोष्टीचे समर्थन नाही करते. महाराष्ट्र आजही सुरक्षित आहे.

    गुन्हेगारीची आकडेवारी

    पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मे 2025 ते मे 2026 या कालावधीत जर आपण पाहिले तर विनयभंग 374 ने कमी, दुखापत 187 ने कमी, जबरी चोरी 271 ने कमी, घरफोडी 295 ने कमी, चोरी 394 ने कमी आणि गुन्हे उघडकीस येण्याचे जे प्रमाण आहे ते 82 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

    60 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल होणार

    एक समाधान यात आहे की, पूर्वी देखील गुन्हे घडत होते. पण जो काही समाज आहे त्याच्या दबावाखाली गुन्हा नोंदवला जात नव्हता. आता गुन्हा नोंदवण्यात वाढ झाली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात 4434 प्रकरणात ओळखीचे आरोपी आहेत, त्यात नातेवाईकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तेव्हा त्यांच्यावर घरून दबाव असायचा. मात्र आता गुन्हा नोंदवला जात आहे. समाज सुधारायचा असेल तर घरचा दबाव संपुष्टात आला, तर मोठा परिणाम होईल. 60 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याचा नवा नियम लागू करण्यात आला आहे.

    439 कोटी रुपये फ्रीज

    ऑपरेशन मुसकानच्या माध्यमातून आतापर्यंत 43 हजार 541 बालकांचा शोध लावला असून त्यांना घरी पोहोचवले आहे. मुळात मी जसे सांगितले की पोलिस आपला तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करू शकतात. त्यानंतरचे काम जुडीश्यरीचे आहे. आज सायबर गुन्ह्यांचा विचार केला तर, रक्कम वेगवेगळ्या देशात जाते. जून 2026 पर्यंत आपण 439 कोटी रुपये आपण फ्रीज करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. त्यात 50 हजारांच्या पेक्षा कमी रक्कम असेल तर तात्काळ आपण परत करू शकतो.

    अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीआयडी, AAIB द्वारे तपास सुरू

    राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जी काही घटना घडली आहे ते आपल्यातून निघून गेले. त्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात सांगायचे झाले तर, त्याचे दोन तपास सुरू आहेत. एक सीआयडी करत आहे आणि दुसरे एएआयबी करत आहे. आपण सीबीआयला सुद्धा विचारले होते की याचा तपास तुम्ही का घेत नाही आहात? त्यावर त्यांनी सांगितले की एएआयबीचा रिपोर्ट आल्याशिवाय आम्हाला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. आतापर्यंत सीआयडीने जो तपास केला आहे, त्यात वेगवेगळ्या गोष्टींसोबत पायलट सुमित कपूर यांच्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यांचे बँक खाते, गुंतवणूक, हे सगळे आपण तपासले असून त्यात कोणतेही संशयास्पद आढळून आले नाही. जे फुटेज मिळाले आहेत त्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. एएआयबीचा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची माहिती घेतली आहे की जे उपकरणं होती, त्यातून सगळी माहिती डाउनलोड करण्यात आली आहे.

    Ajit Pawar Plane Crash: CBI Probe Post AAIB Report, Says CM Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra Assembly : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; विधानसभेत 18 विधेयके पारित, 101 तास 10 मिनिटे चालले कामकाज, सभापतींची माहिती

    CM Devendra Fadnavis : विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफी जाहीर; शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार, 56 लाख शेतकऱ्यांना लाभ – CM देवेंद्र फडणवीस

    Revenue Officers : महसूल खात्यात ‘कलम 155’ चा गैरवापर! पुण्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह 15 अधिकारी निलंबित, महसूलमंत्र्यांची घोषणा