• Download App
    Earthquakes नाशिकमध्ये गुरुवारी दोनदा भूकंपाचे धक्के; 6 दिवसांत 10 वा हादरा बसला; सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे केंद्र

    Earthquakes : नाशिकमध्ये गुरुवारी दोनदा भूकंपाचे धक्के; 6 दिवसांत 10 वा हादरा बसला; सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे केंद्र

    Earthquakes

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Earthquakes नाशिक जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र कायम असून गुरुवारी (३० जुलै) दोन भूकंपाचे धक्के बसले. पहिला धक्का पहाटे २.३७ वाजून ४१ सेकंदांनी ३.८ रिश्टर तीव्रतेचा होता. तर दुसरा धक्का सायंकाळी ५ वाजून ५८ मिनिटांनी जाणवला. याची तीव्रता ३.१ रिश्चर स्केल होती. जिल्ह्यात गत ६ दिवसात एकुण १० वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले आहेत.Earthquakes



    गुरुवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू सुरगाणा तालुक्यात मानूर येथे : जमिनी खाली ८ किलाेमीटरवर होता. २५ जुलैपासून नाशिक जिल्ह्यात सुरू झालेल्या भूकंपमालिकेतील हा सलग १० वा धक्का ठरला आहे. तत्पूर्वी गुरुवारी पहाटे झालेल्या भूकंपाचे केंद्र सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, भोरमाळ आणि कोठुळा परिसरात असल्याचा अंदाज आहे. या भागासह दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्येही सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली.

    Two Earthquakes Hit Nashik in a Day, 10th Tremor in 6 Days Terrifies Surgana Taluka

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra Government : मंत्र्यांच्या दालनात ई-पेपर; 1 सप्टेंबरपासून छापील वृत्तपत्रे बंद:राज्य सरकारचा निर्णय, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचा आंदोलनाचा इशारा

    FDA Inspection : मुंबई हायकोर्टातील कॅन्टीन तपासणीपूर्वीच बंद; एफडीएचे पथक पोहोचले, आम्हीच बंदचा निर्णय घेतला- बॉम्बे बार असोसिएशन

    Nashik Ghatmatha : नाशिक घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट, संभाजीनगरला यलो अलर्ट; जळगाव-विदर्भातही मुसळधारेचा इशारा