विशेष प्रतिनिधी
मुंबई : FDA Inspection हायकोर्टाच्या दणक्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अधिकारी या न्यायालयाच्या आवारातील बॉम्बे बार असोसिएशनच्या (बीबीए) वकिलांच्या कॅन्टीनच्या पाहणीसाठी पोहोचले होते. पाहणीपूर्वीच कॅन्टीनने आपली सेवा तात्पुरती बंद केली होती. हा निर्णय आम्ही स्वयंस्फूर्तीने घेतल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.FDA Inspection
बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव नौशाद इंजिनियर यांनी एका निवेदनात सांगितले की, कॅन्टीन बंद करण्याचे पाऊल असोसिएशनने स्वतःहून उचलले आहे. ३० जुलै रोजी एफडीएकडून कोणताही प्रतिकूल आदेश किंवा नोटीस आम्हाला प्राप्त झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. दक्षिण मुंबईतील या कॅन्टीनची सेवा लवकरच पुन्हा सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.FDA Inspection
बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने एफडीएला सर्व सरकारी आणि निमसरकारी कॅन्टीनची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. यात मंत्रालय आणि उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनचाही समावेश असून, व्हिडिओ रेकॉर्डिंगसह अहवाल सादर करण्यास सांगितले होते. आता ३१ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत एफडीएला राज्यभरात केलेल्या कारवाईचा तपशील सादर करावा लागेल.
रॅडिसन हॉटेलला कोर्टाचा दिलासा : नवी मुंबईतील एका ४ तारांकित हॉटेलचा (पार्क इन बाय रॅडिसन) परवाना निलंबित करण्याचा एफडीएचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द करत त्यांना मोठा दिलासा दिला आहे. हॉटेलने स्वच्छतेचे ९५ टक्के निकष पूर्ण केले असताना केवळ २ झुरळ आढळल्याच्या कारणावरून ३ जुलै रोजी त्यांचा परवाना निलंबित केला होता.
Bombay High Court Canteen Shut Prior to FDA Inspection, Association Claims Voluntary Move
महत्वाच्या बातम्या
- Manmohan Singh : कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांवरील खटला बंद; सुप्रीम कोर्टाची CBI क्लोजरला मंजुरी
- RE – NEET परीक्षेचा निकाल पारदर्शक; उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय; दिशाभूल करणाऱ्या विद्यार्थ्याने पालकांना 5000 रुपयांचा दंड!!
- धर्मांतर केल्यास ‘अनुसूचित जाती’ (SC) दर्जा आणि आरक्षण संपणार; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली फेरविचार याचिका!!
- Red Sea Ship : लाल समुद्रात जहाजांवर कर लावण्याची तयारी; इराणने हुथी बंडखोरांना दिली आयडिया; चीनच्या जहाजांना मिळू शकते सूट