विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर :Nashik Ghatmatha राज्यात सलग ८ व्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात २४ तासात २७.६, जळगावात ४० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात तसेच नाशिकमध्ये रिमझिम सुरू होती. मुसळधार पावसामुळे विदर्भ जलमय झाला असून गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झाली. नांदेड जिल्ह्यातील उमरी बाजार मंडळात (ता. किनवट) अतिवृष्टी झाली.Nashik Ghatmatha
महाराष्ट्रात जून, जुलै महिन्यामध्ये गेल्या ५ वर्षातील सर्वात कमी पाऊस यावर्षी पडला आहे. सरासरीच्या तुलनेत राज्यात प्रथमच १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. २०२२ ते २०२५ या ४ वर्षांत जून, जुलै मिळून राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. यंदा पहिल्या २ महिन्यात सरासरी ५२७.८ मिमीच्या तुलनेत ५०८.७ मिमी पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ९६.४ टक्के आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातही २ महिन्यात गेल्या ५ वर्षात दुसऱ्यांदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. विभागात ८१.१ टक्के पाऊस झाला. २०२५मध्ये ९२.२ टक्के पाऊस पडला होता. त्यापूर्वीच्या ३ वर्षांत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता.Nashik Ghatmatha
मराठवाड्यात यंदाच्या पहिल्या दोन महिन्यात ८२.१% पाऊस
नाशिक घाटमाथ्यावर आज रेड, संभाजीनगरात यलो अलर्ट
जळगाव, विदर्भात मुसळधार तर संभाजीनगरात जोरदार जलधारा
पैठण : जायकवाडीत ७२ टक्के जलसाठा; ५७,४७३ क्युसेकने पाणी येणे सुरू
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ५७ हजार ४६३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. यामुळे धरणाचा उपयुक्त जलसाठा ७२ टक्क्यांवर पोहोचला असून, मराठवाड्यासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे.
जायकवाडी धरणातील सध्याची पाणीपातळी १५१६.३१ फूट इतकी झाली आहे. धरणात ५४.६२ टीएमसी (१५४६.७३२ दशलक्ष घनमीटर) इतका जिवंत पाणीसाठा असून एकूण पाणीसाठा ८०.६८ टीएमसी नोंदवण्यात आला आहे. धरणाची उपयुक्त साठवण क्षमता ७६.६७ टीएमसी असून त्यापैकी ७२ टक्के साठा भरला आहे. दरम्यान, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांतून विसर्ग सुरूच आहे. गुरुवारी सायंकाळी निळवंडे धरणातून १०,२०९ क्युसेक, तर ओझर वेअरमधून ५,६६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यात पावसामुळे 4 गावांचा संपर्क तुटला
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून सलगपावसामुळे पैनगंगा नदीसह परिसरातील सर्वचनदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळेपांगरपहाड, आंदबोरी, रेवानाईक तांडा आणिअप्पारावपेठ या गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्कपूर्णपणे तुटला आहे. शेतात व पिकांमध्ये पाणीसाचल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसानहोण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.प्रशासनाने पूरग्रस्त भागातील नागरिकांनासुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू केलीआहे. तसेच ३० जुलै रोजी छत्रपतीसंभाजीनगर, बीड, जालना, हिंगाेली,परभणी, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत देखीलपावसाने हजेरी लावली.
परभणी जिल्ह्यात १४ मिमी : परभणीजिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत मध्यमस्वरूपाच्या पावसाची नोंद झाली असून,जिल्ह्याची सरासरी पावसाची नोंद १४.१मिलिमीटर इतकी झाली आहे. जिल्ह्यातीलपूर्णा तालुक्यात सर्वाधिक २७.४ मिमी पाऊसझाला. सेलू तालुक्यात सर्वात कमी ७ मिमीपावसाची नोंद झाली.तालुकानिहाय झालेल्यापावसामध्ये गंगाखेड येथे १६.७ मिमी, जिंतूरयेथे १६.३ मिमी, पालम येथे १४.६ मिमी,परभणी येथे १२.६ मिमी, सोनपेठ येथे १२.५मिमी, मानवत येथे ८.८ मिमी आणि पाथरीयेथे ८.१ मिमी पाऊस झाला. दरम्यान,धाराशिव जिल्ह्यात गुरुवारी धाराशिवशहरासह आठही तालुक्यांत दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. आकाशात दाट ढगांचीगर्दी होती. दिवसभर पाऊस सुरू होता.यामुळेशहरातील अनेक रस्ते चिखलमय झाले.
Nashik Ghatmatha Red Alert, Sambhaji Nagar Yellow Alert: Heavy Rains Lash Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Manmohan Singh : कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांवरील खटला बंद; सुप्रीम कोर्टाची CBI क्लोजरला मंजुरी
- RE – NEET परीक्षेचा निकाल पारदर्शक; उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय; दिशाभूल करणाऱ्या विद्यार्थ्याने पालकांना 5000 रुपयांचा दंड!!
- धर्मांतर केल्यास ‘अनुसूचित जाती’ (SC) दर्जा आणि आरक्षण संपणार; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली फेरविचार याचिका!!
- Red Sea Ship : लाल समुद्रात जहाजांवर कर लावण्याची तयारी; इराणने हुथी बंडखोरांना दिली आयडिया; चीनच्या जहाजांना मिळू शकते सूट