Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; 42.88 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल
स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगून निष्पाप भक्तांना आणि श्रीमंत व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या अशोक एकनाथ खरात ऊर्फ ‘भोंदू कॅप्टन बाबा’ याच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठा कायदेशीर फास आवळला आहे. ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात 42.88 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तब्बल 3 हजार पानांचे अवाढव्य आरोपपत्र दाखल केले आहे.