• Download App
    ashok kharat फडणवीसांनी अशोक खरातच्या मुसक्या आवळेपर्यंत विरोधक झोपले होते, पण आता त्यांच्यातले "पोपट" बोलायला लागले!!

    फडणवीसांनी अशोक खरातच्या मुसक्या आवळेपर्यंत विरोधक झोपले होते, पण आता त्यांच्यातले “पोपट” बोलायला लागले!!

    नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू बाबा अशोक खरात यांच्या मुसक्या आवळेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे विरोधक झोपले होते. विरोधकांपैकी एकाही नेत्याला अशोक खरात हे प्रकरण माहिती सुद्धा नव्हते. नाशिकचा पत्रकार दत्तात्रय खेमनार याने अशोक खरातचे कारनामे उघडकीस आणल्यानंतर त्याकडे विरोधकांनी लक्ष सुद्धा दिले नव्हते. विरोधकांपैकी एकाही आमदाराने किंवा खासदाराने विधिमंडळात किंवा संसदेत अशोक खरात हे प्रकरण लावून धरले नव्हते.

    – सगळी सूत्रे हलविली फडणवीसांनी

    पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अत्यंत वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलवून अशोक खरात यांच्या मुसक्या आवळल्या. फडणवीस ही सगळी सूत्रे गेल्या 15 दिवसांपासून हाताळत होते. त्यावेळी विरोधकांपैकी एकालाही अशोक खरातच्या प्रकरणाची साधी भनक देखील लागली नव्हती. अशोक खरातचा जवळचा माणूस केव्हा फुटला??, तो कुणी फोडला??, त्याच्याकडून कुठली माहिती मिळविली??, त्यानंतर अशोक खरात याच्या भोवती अटकेचा फास कसा आवळला??, याविषयी विरोधकांना काहीही माहिती नव्हती. तशीच ती माहिती प्रसार माध्यमांना सुद्धा नव्हती.

    – मराठी माध्यमे सुद्धा झोपली होती

    पण देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 15 दिवसांमध्ये पोलिसांमार्फत सगळी सूत्रे हलवून सुमडीत कोंबडी कापून अशोक घरातला त्याच्या बेडरूम मधून अटक करायला लावली. त्यानंतर मात्र सगळ्या विरोधकांना “जाग” आली. महाराष्ट्रात बुवाबाजीचे आणि लैंगिक अत्याचाराचे केवढे भयंकर प्रकरण समोर आले, त्याचा भास विरोधकांना झाला. एरवी पवार आणि ठाकरे यांच्या मागे माईकची बोंडके घेऊन धावणाऱ्या मराठी पत्रकारांना अशोक खरातची “प्रचंड संपत्ती” अचानक “दिसली”. नाशिक जिल्ह्यात त्याच्या जमिनी अचानक विविध ठिकाणी आढळून आल्या. अशोक खरातच्या सगळ्या कारनाम्यांची माहिती आपणच प्रथम देत आहोत, अशा थाटात मराठी माध्यमांनी बातम्या छापल्या किंवा व्हिडिओद्वारे दाखविल्या. प्रत्यक्षात यापैकी एकाही मराठी माध्यमाने शोध पत्रकारिता करून अशोक खरातच्या कारनाम्यांविषयी आधी कुठलीही माहिती काढली नव्हती.



    विरोधकांचे “पोपट” बोलू लागले

    पण अशोक खरातला अटक झाल्यानंतर मात्र सगळे विरोधक खडबडून “जागे” झाले आणि विरोधक “जागे” झाले म्हणून सगळी मराठी माध्यमे सुद्धा अशोक खरात या विषयावर तुटून पडली. सुषमा अंधारे, रूपाली ठोंबरे, अंजली दमानिया यांच्यासारख्या महिला तर बोलू लागल्यास पण उद्धव ठाकरे, भास्कर जाधव, विकास लवांडे यांच्यासारखे विरोधकांमधले “पोपट” सुद्धा मोठमोठ्याने बोलायला लागले. त्यांना अचानक महाराष्ट्र “पुरोगामी” असल्याचा “साक्षात्कार” झाला.

    राऊत, जाधव, लवांडे यांना “साक्षात्कार”

    देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणात एसआयटी नेमून चौकशी आणि तपास सुरू देखील केला पण त्यानंतर भास्कर जाधव यांना जाग येऊन त्यांनी एसआयटी विषयी संशय पेरणी केली. बड्या आरोपींना वाचविण्यासाठीच एसआयटी नेमल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला. संजय राऊत यांना एकदम या प्रकरणात 9 मंत्र्यांचा अडकल्याचे दिसून आले. आरोपी फक्त परधर्मीय असेल असेल, तरच नितेश राणे, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर, महेश लांडगे हे हिंदू आक्रोश मोर्चा काढणार का??, असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी सुद्धा अशोक खरातच्या विषयावर परखड भाष्य करून स्वतःच्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्याच्या शिवालिक संस्थेला 39 लाख लिटर पाणी दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करायची आव्हान दिले. पण भास्कर जाधव यांनी या प्रकरणात फक्त अधिकाऱ्यांना दोषी ठरविले.

    पण वर उल्लेख केलेले हे सगळे घडले केव्हा??, तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून अशोक खरातला अटक केल्यानंतर घडले. तोपर्यंत सगळे विरोधक शांत झोपी गेले होते आणि मराठी माध्यमांना सुद्धा या प्रकरणाची भनक लागलेली नव्हती.

    Opposition leaders talking about ashok kharat after Devendra fadnavis architect his arrest

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashikant Shinde : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपलाय, शरद पवार गटाच्या बैठकीनंतर शशिकांत शिंदेंचे मोठे विधान

    CM Devendra Fadnavis : मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

    Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी