• Download App
    Anjali Damania Alleges Links Between Nashik IG Datta Karale & Ashok Kharat खरात प्रकरणात पोलिस आयजींचं नाव समोर; अंजली दमानियांचा व्हिडीओतून गंभीर आरोप

    Ashok Kharat : खरात प्रकरणात पोलिस आयजींचं नाव समोर; अंजली दमानियांचा व्हिडीओतून गंभीर आरोप

    Ashok Kharat

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : Ashok Kharat  नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. आतापर्यंत राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा होत असलेल्या या प्रकरणात आता थेट पोलिस प्रशासनालाही धक्का बसला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या नव्या खुलाशामुळे प्रकरणात मोठी खळबळ उडाली असून, खरात आणि प्रशासन यांच्यातील संबंधांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.Ashok Kharat

    अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत दत्ता कराळे हे अशोक खरात यांच्या कार्यक्रमात उपस्थित असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये स्पष्टपणे विचारले की, इतक्या वरिष्ठ पदावर असलेले पोलिस अधिकारी अशा वादग्रस्त व्यक्तीच्या कार्यक्रमात का सहभागी झाले? एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी भाषणही केले, असे त्यांनी म्हटले. सामान्य नागरिकांना असा संदेश गेल्यास खरातसारख्या व्यक्तींवर विश्वास निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी नमूद केले.Ashok Kharat



    दमानिया यांनी पुढे आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, दत्ता कराळे यांच्या कॉल रेकॉर्डमध्ये देखील संशयास्पद बाबी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या मते, अशोक खरात यांच्याशी संबंधित 18 कॉल्सचा उल्लेख आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी डिपार्टमेंटल व्हिजिलन्स मार्फत व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या प्रकरणात पोलीस महासंचालकांनी स्वतः लक्ष घालून उत्तरदायित्व निश्चित करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    दरम्यान, यापूर्वीच या प्रकरणात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या बहिणीचीही चौकशी झाली होती. त्यामुळे या प्रकरणाचा आवाका केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून विविध स्तरांवर त्याचे धागेदोरे पसरले असल्याचे स्पष्ट होत आहे.

    खात्यातील अडीच कोटी रुपये गोठवण्यात आले

    अंमलबजावणी संचालनालयानेही या प्रकरणात मोठी कारवाई करत नाशिक, पुणे आणि शिर्डी परिसरात एकाचवेळी छापेमारी केली. या कारवाईत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे पुरावे हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका ठिकाणावरून मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, खरात यांच्या बँक खात्यातील सुमारे अडीच कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. याशिवाय एक आलिशान कारही जप्त करण्यात आली आहे.

    Anjali Damania Alleges Links Between Nashik IG Datta Karale & Ashok Kharat

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Prakash Ambedkar : SC-ST वर्गीकरणावरून प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका; जस्टिस बदर समितीचा अहवाल ‘अवैज्ञानिक’ असल्याचा दावा

    Amravati Horror : अमरावतीत खळबळजनक घटना; 180 तरुणींचे लैंगिक शोषण आणि 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; आरोपी मोहम्मद अयाजला बेड्या

    PM Modi : ट्रम्प यांचा पीएम मोदींना फोन, 40 मिनिटे इराण युद्धावर चर्चा; दोघांनीही म्हटले- होर्मुझ सामुद्रधुनी खुली राहणे महत्त्वाचे