• Download App
    Shirdi Land Scam: Accused Ashok Kharat Clashes with Witnesses During Interrogation भोंदू खरात साक्षीदारांवर संतापला; म्हणाला, तुमच्यामुळे मी वादात अडकलो; साक्षीदारही आक्रमक

    Ashok Kharat : भोंदू खरात साक्षीदारांवर संतापला; म्हणाला, तुमच्यामुळे मी वादात अडकलो; साक्षीदारही आक्रमक

    Ashok Kharat

    विशेष प्रतिनिधी

    शिर्डी : Ashok Kharat शिर्डी येथील गाजत असलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातची पोलिसांनी सलग पाच दिवसांपासून कसून चौकशी केली आहे. तपास यंत्रणांनी या व्यवहारातील आर्थिक व्यवहार आणि दस्तऐवजांची बारकाईने छाननी केली आहे. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी जमीन व्यवहाराशी संबंधित साक्षीदार, मूळ जमीन मालक आणि अशोक खरात यांची समोरासमोर बसवून चौकशी केली.Ashok Kharat

    तेव्हा भोंदू खरात या साक्षीदारांवरच संतापला. ‘तुमच्यामुळे मी वादात अडकलो’, असा त्याच्या संतापण्याचा सूर होता. दरम्यान, खरातची पोलिस कोठडी शनिवारी संपत आहे. पोलिसांनी साक्षीदार सचिन वाणी, प्रभाकर गुंजाळ, भाऊसाहेब चौधरी आणि जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांना भोंदू खरातसमोर बसवून समोरासमोर व्यवहारांबाबत विचारपूस करण्यात आली.Ashok Kharat



    साक्षीदारही आक्रमक

    शिर्डी येथील जमीन व्यवहार प्रकरणाच्या चौकशीत एक नाट्यमय वळण समोर आले आहे. पोलिस कोठडीत असलेल्या अशोक खरात आणि संबंधित साक्षीदारांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. या वेळी साक्षीदार कमालीचे आक्रमक झाले होते. “व्यवहार रद्द करण्याची मागणी आम्ही आधीच केली होती, मात्र तेव्हा तुम्ही बड्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे सांगून आम्हाला गप्प केले. आता प्रकरण अंगलट आल्यावर आम्हालाच जबाबदार का धरता?’ असा थेट सवाल साक्षीदारांनी खरातला विचारला.

    Shirdi Land Scam: Accused Ashok Kharat Clashes with Witnesses During Interrogation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Abhijit Deepke : दीपके म्हणाले- विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई तत्काळ थांबवा; नाहीतर मोठे आंदोलन होईल, CJP चा दोन दिवसांत दुसऱ्यांदा आंदोलनाचा इशारा

    Dattatray Bharne : कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ, काळजी न करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

    Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण; कोर्ट SITच्या तपासाची नियमावली ठरणार; प्रकाश आंबेडकर यांची माहिती, सरकारच्या ठरावावर घेतला आक्षेप