नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर अपेक्षेप्रमाणे शुभेंदू अधिकारी यांची आज भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने निवड केली. ममता राजवटीतले सगळे गदळ दूर करण्याची जबाबदारी भाजपने जुन्या ममता शिष्यावर सोपविली.
– ममतांचे हातखंडे त्यांच्यावरच उलटवले
2019 पासून शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या राजवटी विरोधात रणशिंग फुंकले होते. एकेकाळच्या ममता शिष्याला भाजपने आपल्या जवळ घेऊन त्यांना ताकद दिली होती. पण त्याच वेळी ममतांच्या राजवटीत तयार झालेल्या अधिकारींनी ममतांचेच सगळे राजकीय हातखंडे अजमावून त्यांच्याशी दोन हात केले. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत अधिकारींना अपेक्षित यश मिळाले नाही, पण म्हणून ते खचून गेले नाहीत. त्यांनी ममता बॅनर्जींशी हातमिळवणी सुद्धा केली नाही. त्या उलट, अधिकारी यांनी गेल्या पाच वर्षांत ममता बॅनर्जी यांच्या राजवटीविरुद्ध पश्चिम बंगाल मध्ये अक्षरशः रान उठवले होते. त्याचेच फळ म्हणून भाजपला राज्यात अभूतपूर्व यश मिळाले. अशक्य वाटणारा ममता बॅनर्जींचा पराभव घडून आला. यामध्ये मूळच्या भाजपच्या नेत्यांपेक्षा किंवा संघ संस्कारित नेत्यांपेक्षा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेस मधून फुटून भाजपमध्ये आलेले शुभेंदू अधिकारीच जास्त प्रभावी ठरले. त्यामुळेच भाजपच्या अभूतपूर्व यशानंतर शुभेंदू अधिकारी यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी केंद्रीय भाजपच्या वतीने शुभेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगाल भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
– संघ संस्कारित नेत्यांना जमले नाही, ते…
शुभेंदू अधिकारी हे ममतांना सोडून भाजपमध्ये येण्यापूर्वी मूळच्या भाजपच्या नेत्यांनी आणि संघ संस्कारित नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये भरपूर प्रयत्न करून पाहिले. ममता बॅनर्जींची राजवट आणि कम्युनिस्टांची राजवट त्यांच्याविरुद्ध प्रचंड संघर्ष केला. पण भाजपला या संघर्षात कधी अपेक्षित राजकीय यश मिळू शकले नव्हते. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला आणि आधीच्या केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा ममता बॅनर्जी आणि कम्युनिस्ट यांना पर्याय ठरेल, असे सक्षम नेतृत्व देता आले नव्हते.
– बाहेरून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद
पण मोदी आणि शाह यांच्या राजवटीत बरेच राजकीय चित्र बदलले. संघ आणि भाजप यांनी आपली विशिष्ट पठाडीबद्धता सोडून पक्षाच्या आणि संघ परिवाराच्या बाहेरच्या नेत्यांना आपल्या गोटात स्थान द्यायला सुरुवात केली. त्यांना भाजपमध्ये सुरक्षित स्थान आहे. त्यांचे राजकीय भवितव्य सुरक्षित आणि उज्ज्वल आहे, याचा विश्वास दिला. त्यामुळेच आसाम मध्ये हेमंत विश्वशर्मा यांच्यासारखे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री होऊ शकले. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातून भाजपमध्ये आलेले सम्राट चौधरी यांना बिहारचे मुख्यमंत्रीपद दिले.
– ममता राजवटीतले गदळ दूर करण्याची जबाबदारी
नेमके तेच शुभेंदू अधिकारी यांच्या बाबतीत सुद्धा घडले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शुभेंदू अधिकारी यांना राजकीय भवितव्य सुरक्षित आणि उज्ज्वल असल्याचा विश्वास दिला. त्यामुळे त्यांनी पश्चिम बंगालमध्ये झपाट्याने काम करून ममता बॅनर्जी यांच्या राजवटीची घट्ट पकड सैल करून टाकली. विधानसभा निवडणुकीत शेवटचा घाव घालून ममतांची राजवट उद्ध्वस्त केली. त्यामुळेच भाजपने शुभेंदू अधिकारी यांना पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री करून ममता राजवटीतले सगळे गदळ आणि घाण दूर करण्याची जबाबदारी सोपविली.
Suvendu Adhikari elected as the Leader of West Bengal BJP Legislative Party
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या वाढून 37 होईल; मंत्रिमंडळाची प्रस्तावाला मंजुरी, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक
- जंग जंग पछाडले, पद काही मिळेना; पण स्वतःच्या तोंडून महत्त्वाकांक्षा जाहीर करायची हौस काही फिटेना!!
- दीदी, आप हारी नही, म्हणून अखिलेश यादवांकडून ममतांचा हिरवी शाल घालून सत्कार; पुढच्या राजकारणाची चाहूल!!
- Supreme Court : सबरीमाला केस, सुप्रीम कोर्ट म्हणाले- वारंवार भूमिका बदलू शकत नाही; बोहरा समाजातील धार्मिक