विशेष प्रतिनिधी
लातूर :Motegaonkar री-नीट परीक्षेचा निकाल जाहीर होताच लातूरमधील आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. मात्र सीबीआयच्या ७ सदस्यीय पथकाने शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता या क्लासेसच्या कार्यालयात धाड टाकली. रात्री ९ वाजेपर्यंत पथकाने कागदपत्रांची सखोल झडती घेतली.Motegaonkar
नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानंतर सीबीआयचे पथक यापूर्वी तब्बल महिनाभर लातूरमध्ये मुक्कामी होते. तेव्हा तपासादरम्यान मोटेगावकरसह प्रा.पी.व्ही.कुलकर्णी व डॉ.मनोज शिरुरे या तिघांना अटक केली होती. मात्र, री-नीट परीक्षेचा निकाल जाहीर होताच सीबीआयने पुन्हा लातूरकडे मोर्चा वळवला. सूत्रांनुसार, झडतीदरम्यान सीबीआयने पूर्वीची नीट परीक्षा तसेच री-नीट परीक्षा दिलेल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदी, शैक्षणिक कागदपत्रे, इतर संबंधित नोंदी यांची छाननी केली. मात्र, नेमकी कोणती कागदपत्रे जप्त करण्यात आली, तपासाचा केंद्रबिंदू काय होता, याबाबत सीबीआयकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.Motegaonkar
संशयित विद्यार्थ्यांचा निकाल राखीव आणि पुन्हा झाडाझडती
पेपरफुटी प्रकरणात ज्या डॉक्टरांची चौकशी झाली होती, त्यातील काहींच्या मुलांनी नीटची परीक्षा दिलेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, यातील २ डॉक्टरांच्या मुलांचा नीटचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. हा राखीव ठेवलेला निकाल, सीबीआयची पुन्हा झाडाझडती, यांचा परस्पर संबंध असावा, अशी शक्यता शैक्षणिक क्षेत्रात वर्तवण्यात येत आहे.
CBI Raids Motegaonkar RCC Classes in Latur Following NEET Results
महत्वाच्या बातम्या
- पोलिसी बळावर टेल्कोचे आंदोलन मोडून काढणाऱ्या पवारांना सोनम वांगचुकचे आंदोलन मोडून काढल्याचे दुःख!!
- सुप्रिया सुळे यांना पुढचे काही दिवस गप्प राहण्याचा सल्ला; पण दिला कुणी आणि कशासाठी??
- आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘फिनोलेक्स’चा पुढाकार; लाखो साहित्याचे वाटप; वारकऱ्यांकडूनही उपक्रमाचे कौतुक
- Japan : बुलेट-ट्रेन प्रकल्प उशिरा झाल्याने जपानचे माजी मंत्री नाराज; म्हटले- आम्ही खूप मेहनत केली, पण भारतीय मंत्र्यांचे वर्तन खराब होते