Motegaonkar : लातुरात मोटेगावकर क्लासेसवर सीबीआयची धाड:4 तास झडती नीट निकालानंतर जल्लोषासाठी जमले होते विद्यार्थी
री-नीट परीक्षेचा निकाल जाहीर होताच लातूरमधील आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. मात्र सीबीआयच्या ७ सदस्यीय पथकाने शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता या क्लासेसच्या कार्यालयात धाड टाकली. रात्री ९ वाजेपर्यंत पथकाने कागदपत्रांची सखोल झडती घेतली.