विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप झाला त्यावर सगळ्या विरोधी पक्षांनी दिवसभरात राजकीय पोळी भाजून घेतली. राहुल गांधींपासून ते अखिलेश यादव यांच्यापर्यंत सगळ्यांनी मोदी सरकारला घेरले. पण आंदोलक संसद परिसरात घुसून गदारोळ करणार असल्याची बातमी मात्र विरोधकांनी दडपली. पोलिसांनी आंदोलकांना संसदेच्या परिसरात घुसू दिले नाही. त्यांनी संसद परिसराची सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख ठेवली. cockroach
– ५० पोलीस जखमी
पण याच दरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी दिल्लीमध्ये हिंसाचाराचा जोरदार धुमाकूळ घातला. त्यांनी अनेक रस्त्यांवर उतरून मोठी दगडफेक केली. यामध्ये फिरोजशहा मार्ग आणि कॅनॉट प्लेस या गर्दीच्या भागात सुद्धा दगडफेक केली. त्यांनी पोलिसांना टार्गेट केले. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत तब्बल ५० पोलीस आणि अन्य सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. जखमींमध्ये १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कॉकरोच आंदोलकांनी आणि शबाना आजमी, चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या लिबरल लोकांनी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या बातम्यांचे भांडवल केले. पण आंदोलकांनी दिल्लीतल्या रस्त्या रस्त्यांवर दगडफेक करून पोलिसांना जखमी केल्याच्या बातम्यांवर साधी प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली नाही.
– सीसीटीव्ही तपासून पुढची कारवाई
पण पोलिसांनी कायदेशीर कारवाई थांबवलेली नाही. पोलिसांनी आपल्या जखमी सहकाऱ्यांना आणि अन्य सुरक्षा कर्मचाऱ्यांना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. पण त्याच वेळी पोलिसांनी अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरचे सीसीटीव्ही तपासून, त्यांचे व्हिडिओ फुटेज तपासून पुढच्या कायदेशीर कारवाईला सुरुवात केली. दगडफेकीत आणि अन्य हिंसाचारामध्ये सामील असलेल्यांना पोलीस सोडणार नाहीत, असा इशारा दिल्ली पोलिसांनी सायंकाळी ट्विट करून दिला. त्यामुळे जंतर – मंतर खाली झाले असले तरी पोलिसांच्या कायदेशीर कारवाईचा बडगा मात्र कायम राहणार आहे, हेच वास्तव या निमित्ताने समोर आले.
Police accused of lathi-charging ‘cockroach’ protesters.
महत्वाच्या बातम्या
- Rocket Vikram-1 : भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपण यशस्वी; 450 किमी वर कक्षेत पोहोचले; PM मोदींनी केले अभिनंदन
- Abhishek Banerjee’ : उत्तर परगणामध्ये अभिषेक बॅनर्जींचे पक्ष कार्यालय तोडण्यात आले; नकाशा मंजूर न करता बांधकाम झाले होते
- Trump : अमेरिकेतून 18 हजार भारतीय डिपोर्ट होणार; अपील करण्याचीही संधी नाही; ट्रम्प सरकारने 2025 मध्ये भारतीयांना बेड्या घालून पाठवले होते
- मोदी सरकार संसदेत Delimitation bill मांडणार की नाही??; विरोधक पडले संभ्रमात!!