नाशिक : नीट परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली. त्यावर देशात मोठा गदारोळ झाला. कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतले जंतर – मंतरवर आंदोलन केले. सोनम वांगचुकने उपोषण केले. त्या आंदोलनावर आज किरकोळ लाठीमार झाला. त्यानंतर शबाना आजमी, चंद्रशेखर आझाद यांच्या सारखे देशातले लिबरल लोक जंतर-मंतरवर पोहोचले. तिथे त्यांनी “शाहीन बाग” करायचा प्रयत्न केला.
– केरळ मध्ये पेपर फुटला
पण याच दरम्यान केरळच्या काँग्रेस सरकारच्या राजवटीमध्ये केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे संपूर्ण राज्यातली शिक्षा रद्द करावी लागली तिथल्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. याकडे कॉकरोच जनता पार्टीचे किंवा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या लिबरल लोकांचे लक्ष सुद्धा गेले नाही.
याच दरम्यान सोनम वांगचुक याने सफदरजंग रुग्णालयातून निवेदन जारी करून तीन अटींवर उपोषण मागे घेण्याचे मान्य केले, पण सरकारने त्याच्या अटींकडे आतापर्यंत तरी कुठले लक्ष दिले नाही. मात्र सोनम वांगचूपच्या तीन अटींमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख सुद्धा नाही.
– जंतर-मंतरवर किरकोळ लाठीमार
संसदेचे अधिवेशन सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जंतर – मंतर वरल्या आंदोलकांनी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना अडवून किरकोळ लाठीमार केला, पण त्यामुळेच देशात काही विशिष्ट शहरांमध्ये मोठा गदारोळ उभा करायचा प्रयत्न झाला. विद्यार्थ्यांच्या आंदोलन देशभर पेटल्याच्या बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. विरोधी खासदारांनी संसदेपासून जंतर – मंतर पर्यंत मोर्चा काढला. त्यामध्ये प्रामुख्याने समाजवादी पार्टीचे खासदार सामील झाले. काँग्रेसचे खासदार त्या मोर्चाकडे फिरकल्याचे दिसले नाही. मात्र शबाना आजमी चंद्रशेखर आझाद वगैरे लिबरल लोकांनी जंतर – मंतर वर जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तिथे हे आंदोलन गेले २० दिवस सुरू होते, तेव्हा शबाना आजमी किंवा चंद्रशेखर आझाद हे लिबरल लोक तिकडे फिरकले नव्हते. पण संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर संसदेवर आणि जनता नमंतरवर प्रसिद्धीचा फोकस आला त्याबरोबर शबाना आजमी आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे लिबरल लोक जंतर – मंतरवर पोहोचले. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून जंतर-मंतरवरच्या एका कोपऱ्यातल्या लाठी मारायचा व्हिडिओ शेअर करत सरकारचा निषेध केला.
– केरळ मधल्या पेपर फुटीची दाखलही नाही
पण यापैकी कुणालाही केरळ मधल्या पेपर फुटीची साधी बहन काही नव्हती. केरळमध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पेपर फुटला त्यामुळे संपूर्ण परीक्षा रद्द करावी लागली केरळ मधल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. या मुद्द्याकडे कॉक्रोच जनता पार्टीचे किंवा लिबर्ट लोकांचे लक्ष सुद्धा गेले नाही. भाजपने सुद्धा तो मुद्दा केंद्रीय पातळीवर लावून धरल्याचे दिसले नाही.
Protesters gathered for CJP’s protest march clash with RPF personnel at Jantar Mantar
महत्वाच्या बातम्या
- Rocket Vikram-1 : भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपण यशस्वी; 450 किमी वर कक्षेत पोहोचले; PM मोदींनी केले अभिनंदन
- Abhishek Banerjee’ : उत्तर परगणामध्ये अभिषेक बॅनर्जींचे पक्ष कार्यालय तोडण्यात आले; नकाशा मंजूर न करता बांधकाम झाले होते
- Trump : अमेरिकेतून 18 हजार भारतीय डिपोर्ट होणार; अपील करण्याचीही संधी नाही; ट्रम्प सरकारने 2025 मध्ये भारतीयांना बेड्या घालून पाठवले होते
- मोदी सरकार संसदेत Delimitation bill मांडणार की नाही??; विरोधक पडले संभ्रमात!!