रामनवमीच्या दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मांसाहाराचा वाद निर्माण करून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे अभाविप यांच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. त्यात काही विद्यार्थी जखमी झाले. या बातम्या सर्व प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. या बातम्या देतनाही प्रत्येकाने त्यात “आपला रंग” निवडला आहे आहे. एनडीटीव्ही सारख्या न्यूज चॅनेल फक्त मांसाहाराचा वाद जेएनयू मध्ये झाल्यामुळे हिंसाचार झाल्याचा बातम्या दिल्या आहेत. परंतु रामनवमीच्या दिवशी काही विशिष्ट विद्यार्थ्यांनी मांसाहाराचा आग्रह धरला आणि त्यांनी रामनवमीच्या पूजेमध्ये अडथळा निर्माण केला हे सत्य मात्र दडवून ठेवण्यात आले. बातम्या देताना सगळ्या भर हा जेएनयू मध्ये धर्मनिरपेक्षता कशी धोक्यात आहे… अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी कसा धुडगूस घातला… हेच दाखविण्याकडे दिसला आहे. RamNavmi JNU: Ram Navami in JNU meat feud and jihadi mentality in Pune at the urging of the atheist council to feed !!
यातली वास्तविकता अशी की एरवी कावेरी काय किंवा अन्य कोणत्याही काय हॉस्टेलमध्ये मांसाहार करण्यावरून कोणी कोणाला टोकले आहे का?? पण मग रामनवमीच्या दिवशीच मांसाहाराचा आग्रह धरून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांना नेमके कोणाला डिवचायचे आहे?? आणि ते डिवचत असताना दिवसही कशाप्रकारे निवडला जातो, हे महत्त्वाचे नाही का…??
रामनवमीला मांसाहार मिळाला नाही म्हणून दगडफेक करण्यापर्यंत विद्यार्थ्यांची मजल गेली. रामनवमीला मांसाहार करण्याचे “त्या” विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य आहे. पण रामनवमी साजरी करण्याचे “या” विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य नाही… हीच मानसिकता स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांची दिसत नाही का??
इतकेच नाही तर तिकडे दिल्लीत रामनवमीच्या दिवशी जेएनयू मध्ये मांसाहाराचा वाद उकरून काढला जातो आणि पुण्यात त्याच दिवशी नास्तिक परिषद भरवण्याचा आग्रह धरला जातो. यात शहरांमधले अंतर खूप मोठे असलेले तरी मानसिकतेतले अंतर अजिबात दिसत नाही…!!
नास्तिक परिषद भरवण्यासाठी कोणत्याही धर्माचे सण सोडून नास्तिक परिषद भरवता येणे शक्य असताना नेमका रामनवमीच्या दिवशी नास्तिक परिषद भरवण्याचा आग्रह धरणे हे कोणत्या मानसिकतेचे लक्षण आहे…?? याचा नीट विचार केला तर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि नास्तिक परिषदेचे आयोजक यांची मूलभूत मानसिकता ही कशी हिंदू विरोधी आहे, हे सांगायला कोणत्याही रॉकेट सायन्सचा अभ्यास करण्याची गरज नाही…!!
आता जेव्हा देशभर हिंदुत्वाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे, काही धोरणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने पुढे सरकताना दिसत आहे तेव्हाच तथाकथित बुद्धिवादातून त्याला विरोध करण्याची जिहादी मानसिकता हीच यातून उघड होते. अन्यथा ज्या नास्तिक परिषदेचे नावही फारसे कुठे आले नव्हते… ती नास्तिक परिषद पुण्यात भरवायची आणि ती देखील रामनवमीच्या दिवशी… त्याचा गवगवा करायचा…. पोलिसांनी परवानगी नाकारली म्हणून पत्रकार परिषदा घ्यायच्या. नास्तिक परिषदेला नाव भगतसिंगांचे द्यायचे… हा उघडपणे प्रख्यात क्रांतिकारकांच्या नावाने केलेला “जिहादी बौद्धिक हल्ला” नाही तर दुसरे काय म्हणायचे…??
जे जेएनयू मध्ये घडले तेच नास्तिक परिषदेच्या निमित्ताने पुण्यात वेगळ्या पद्धतीने घडवायचे हा डाव नव्हता का…?? नास्तिक परिषदेचे आयोजन करून आयोजक कोणता असा “बौद्धिक तीर” मारणार होते…?? की ज्यातून देशाचे वैचारिक भरण-पोषण होणार होते…?? बौद्धिक हल्ला तर धर्म भावनाच दुखावणारा करायचा होता ना!! तो देखील हेतुतः रामनवमीच्या दिवशी धर्म भावना दुखावणारा होता ना… मग ही मानसिकता नेमके काय सांगते…?? कोणत्या दिशेला बोट दाखवते…??… जिहादी मानसिकता अशी वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळे मुखवटे घेऊन पुढे येते हेच यातले सत्य आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App