विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमध्ये भंगार व्यावसायिकांचा 100 कोटींचा जीएसटी घोटाळा उघड झाला आहे. बनावट कागदपत्रांद्वारे इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवत फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. कामगारांच्या नावे बनावट कंपन्या दाखवून हा सगळा घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे. 100 crore GST scam of scrap dealers exposed in Nashik; Relationship with Nawab Malik ??
काही दिवसांपूर्वीच भंगार व्यावसायिकांवर छापे घातले होते. नवाब मलिक यांच्याशी संबंधीत काही व्यवहार झाले आहेत का? या संदर्भात चौकशी करण्यासाठी हे छापे होते. नाशिकमध्ये असणारा हा भंगार व्यवसाय कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा हा चर्चेचा विषय बनला आहे. चौधरी नामक व्यावसायाने हा घोटाळ केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांनी हा 100 कोटींचा घोटाळा केल्याचे बोलले जात आहे.
कामगारांच्या नावे कंपन्या दाखवण्यात आल्या. पण प्रत्यक्षात मात्र या कंपन्या अस्तित्त्वात नाहीत. सध्या अटकपूर्व जामिनासाठी या व्यावसायिकांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप त्यांना अटक झालेली नाही. परंतु एक मोठा घोटाळा जीएसटीच्या माध्यमातून नाशिकमध्ये झाल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे आणि लवकरच पुढचे बरेच धागेदोरे समोर येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App