विशेष प्रतिनिधी
मुंबई : गृहमंत्री पदाच्या काळात मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून ज्यांच्या सोबत काम केले ते परमबीर सिंह खंडणीखोर असल्याचा साक्षात्कार आता अनिल देशमुख यांना झाला आहे.Now Anil Deshmukh said Parambir Singh is a ransom seeker, questioned how his complaints were acted upon
खून आणि खंडणीसारखे गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीने म्हणजेमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आपल्यावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे;
परंतु आपण अनेक गुपिते उघड केली नसल्याचा दावा करून देशमुख यांच्या वतीने परमबीर यांच्या तक्रारीच्या आधारे दाखल गुन्ह्य़ावर बुधवारी प्रश्न उपस्थित करण्यात आला. कारवाई कुहेतूने नसल्याचा प्रतिदावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केला. ईडीने बजावलेल्या समन्सविरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शंभर कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणामुळे देशमुख यांना यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनेक वेळा समन्स बजावले. मात्र ते ईडी समोर हजर झाले नाहीत. ते फरार असल्याची चर्चा आहे.
अनिल देशमुख चौकशीसाठी हजर का राहिले नाहीत याबाबत त्यांचे वकिल इंडरपाल सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.ईडीला काही काळ वाट पाहण्यास आम्ही सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आम्ही याचिका दाखल केली आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल तोपर्यंत थांबाव, असं पत्र आम्ही ईडीला दिलं आहे, असं अनिल देशमुखांचे वकिल इंदरपाल सिंह यांनी म्हटले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App