Rafale Deal : फ्रान्समध्ये राफेल कराराच्या चौकशीसाठी न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. फ्रान्सच्या पब्लिक प्रोसीक्युशन सर्व्हिसेसच्या फायनान्शिअल क्रिम्स ब्रँचने (पीएनएफ) म्हटले आहे की, ते या करारावरील भ्रष्टाचार आणि पक्षपातीपणाच्या आरोपांची चौकशी करतील. France big action to investigate Rafale deal, appointment of judge, many VIPs in siege
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : फ्रान्समध्ये राफेल कराराच्या चौकशीसाठी न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. फ्रान्सच्या पब्लिक प्रोसीक्युशन सर्व्हिसेसच्या फायनान्शिअल क्रिम्स ब्रँचने (पीएनएफ) म्हटले आहे की, ते या करारावरील भ्रष्टाचार आणि पक्षपातीपणाच्या आरोपांची चौकशी करतील.
यासंदर्भात फ्रेंच स्वयंसेवी संस्था शेर्पाकडून तक्रार दिल्यानंतर आणि फ्रेंच प्रकाशन मीडियापार्टने अनेक वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर हे पाऊल उचलले गेले आहे. सन 2018 मध्येही शेर्पाने तक्रार दाखल केली होती; पण त्यानंतर पीएनएफने ती नाकारली. राफेल लढाऊ विमानांसाठी 7.8 अब्ज युरोची डील होती.
शुक्रवारी फ्रेंच प्रकाशन मीडियापार्टने 14 जून रोजी दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गुन्हेगारी चौकशी सुरू केल्याचे वृत्त दिले आहे. राफेल करारावर स्वाक्षरी झाल्यावर पदावर असलेले फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रँकोइस ओलांडे आणि तत्कालीन अर्थमंत्री असलेले फ्रान्सचे विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या कामगिरीवरही या चौकशी होईल. तत्कालीन संरक्षणमंत्री आणि आता फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-यवेस ले ड्रायन यांनाही संबंधित गोष्टींविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो.
यावेळी डसॉल्ट एव्हिएशनकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. यापूर्वी, कंपनीने भारत-फ्रेंच करारामध्ये कोणताही भ्रष्टाचार झाल्याचे नाकारले होते. त्यांचे म्हणणे आहे की, अधिकृत संघटनांकडून अनेक नियंत्रणे वापरली जातात. 36 राफेलसंदर्भात भारताशी झालेल्या करारामध्ये कोणताही गडबड झालेली नाही.
वास्तविक, करारामध्ये हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) होते, मात्र नंतर दोन्ही पक्षांमधील चर्चा खंडित झाली. नंतर दोन्ही देशांमध्ये 2016 मध्ये एक करार झाला होता, ज्या अंतर्गत 36 राफेल विमानांची किंमत 7.8 अब्ज युरो निश्चित करण्यात आली होती.
जहां तक जांच की बात है तो भारत के सर्वोच्च न्यायालय और CAG ने राफेल को लेकर अपनी रिपोर्ट को जनता के बीच रखा है। हिंदुस्तान की जनता ने इन दोनों रिपोर्ट को देखा है। – डॉ @sambitswaraj pic.twitter.com/kX217H5Xgk — BJP (@BJP4India) July 3, 2021
जहां तक जांच की बात है तो भारत के सर्वोच्च न्यायालय और CAG ने राफेल को लेकर अपनी रिपोर्ट को जनता के बीच रखा है।
हिंदुस्तान की जनता ने इन दोनों रिपोर्ट को देखा है।
– डॉ @sambitswaraj pic.twitter.com/kX217H5Xgk
— BJP (@BJP4India) July 3, 2021
दुसरीकडे, काँग्रेसने फ्रान्समधील चौकशीकडे बोट दाखवत केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. राफेल प्रकरणी जेपीसी चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. यानंतर भाजपनेही काँग्रेसला जोरदार उत्तर दिले आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, चौकशीचा प्रश्न असेल तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणाचे तथ्य सर्वांसमोर ठेवलेले आहेत. कॅगनेही याप्रकरणी रिपोर्ट दिली आहे. हिंदुस्थानातील तमाम जनतेने ही रिपोर्ट पाहिली आहे. राफेल प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झालेला नसताना विरोधक मात्र साप-साप म्हणून भुई धोपटत असल्याचा प्रकार होत आहे.
France big action to investigate Rafale deal, appointment of judge, many VIPs in siege
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App