Oil india Recruitment : ऑईल इंडियामध्ये 12वी पास तरुणांची 120 जागांवर भरती; असा करा अर्ज

Oil india limited recruitment 2021 for junior assistant 120 vacencies 12th pass can apply

Oil india limited recruitment 2021 : ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये ज्युनियर असिस्टंट या पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना ऑइल इंडियाची अधिकृत वेबसाईट www.oil-india.com वर ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. अधिसूचनेनुसार 120 जागांवर भरती होणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना नीट वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Oil india limited recruitment 2021 for junior assistant 120 vacancies 12th pass can apply


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये ज्युनियर असिस्टंट या पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना ऑइल इंडियाची अधिकृत वेबसाईट www.oil-india.com वर ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. अधिसूचनेनुसार 120 जागांवर भरती होणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना नीट वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये ज्युनियर असिस्टंट पदासाठी किमान 12वी पास असणं आवश्यक आहे. यासोबतच 6 महिन्यांचा कॉम्युटर अ‍ॅप्लिकेशन डिप्लोमाही गरजेचा आहे. उमेदवारांची निवड अर्जांसोबतच एका परीक्षेद्वारे होणार आहे. 100 गुणांसाठी 2 तासांची सीबीटी परीक्षा होईल. यातील गुणांनुसार मेरीट लिस्ट लागणार आहे.

ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये ज्युनियर असिस्टंट पदासाठी वयोमर्यादा 18-30 वर्षे असणं गरजेचं आहे. तथापि, नियमानुसार आरक्षित प्रवर्गासाठी वयामध्ये सूट असेल. ओबीसींसाठी 3 वर्षे आणि एससी, एसटीसाठी 5 वर्षे सूट मिळेल. उमेदवारांना अर्जाबरोबरच 200 रुपयांचे शुल्कही द्यावे लागणार आहेत. दरम्यान, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क माफ आहेत. अर्जांना 1 जुलैपासून सुरुवात झालेली असून अर्जाची अंतिम मुदत 15 ऑगस्टपर्यंत आहे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Oil india limited recruitment 2021 for junior assistant 120 vacancies 12th pass can apply

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात